19 February 2020

News Flash

वार्षिक राशिभविष्य : १२ नोव्हेंबर २०१५ – ३० ऑक्टोबर २०१६

या नूतन वर्षी ११ ऑगस्टपर्यंत सिंह राशीतील गुरू ग्रह अनुकूल राहणार आहे.

13-rashi-yrly-patti

01-rashi-meshमेष : चांगले ग्रहमान

या नूतन वर्षी ११ ऑगस्टपर्यंत सिंह राशीतील गुरू ग्रह अनुकूल राहणार आहे. ग्रहमान चांगले लाभले असल्याने नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक करू शकाल. जमीन-शेअर्स खरेदी-विक्री व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्यविषयक चिंता या नूतन वर्षी दूर होईल. शरीरस्वास्थ्य आणि मन:स्वास्थ्य राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण करू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. छान गृहसौख्य लाभेल. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. अधिकारप्राप्तीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात छान यश मिळेल.

डिसेंबर २०१५ : वर्षांरंभी काही महत्त्वपूर्ण घटना घडतील. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी कराव्या लागतील. अर्थप्राप्ती होईल. त्यामुळे खर्चाचे प्रश्न सुटतील. स्पर्धा-पैजा जिंकाल.

जानेवारी २०१६ : १४ जानेवारीनंतर मकरेचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात येईल. प्रवास मनाजोगे कार्यसाधक होतील. आप्तेष्ट-मित्रांच्या भेटीगाठी होतील. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. अध्ययनात छान प्रगती होईल.

फेब्रुवारी २०१६ : सिंहेचा गुरू पंचमस्थानी शुभयोगात आहे. सूर्य, बुध, शुक्र अनुकूल आहेत. मार्गातील अडथळे दूर होतील. प्रगतीचा वेग वाढवाल. आरोग्य छान राहील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल.

मार्च २०१६ : कुंभेचा सूर्य १४ मार्चपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे या महिन्याच्या पूर्वार्धात करून घ्या. मन:स्वास्थ्य राहील. मेहनत यशस्वी होईल. आनंदवार्ता समजतील. महिलांना गृहसौख्य मिळेल. बचत कराल.

एप्रिल २०१६ : सिंहेचा गुरू पंचमस्थानी शुभयोगात आहे. प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसा खर्च कराल. आनंद वाटेल. यश येईल.

मे २०१६ : गुरू-शुक्र शुभयोगात आहेत. उत्तम ग्रहमान छान प्रगती घडवील. तुमच्या मेहनतीस न्याय मिळेल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. मोठी कामे कराल. प्रसंगावधान दाखवाल. आरोग्य छान राहील. मनोबल वाढेल.

जून २०१६ : १४ जूनपासून मिथुनेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. बुध, गुरू, शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्य छान राहील. प्रिय भेटीगाठी होतील. प्रश्न सुटतील.

जुलै २०१६ : १६ जुलैपर्यंत मिथुनेचा सूर्य पराक्रमस्थानी शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होतील. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. आर्थिक येणे वसूल होईल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.

ऑगस्ट २०१६ : सिंहेचा गुरू ११ ऑगस्टपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या, यशस्वी होतील. व्यवहारी राहाल. अर्थप्राप्ती होईल. आरोग्य ठीक राहील. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. घरात प्रसन्नता राहील.

सप्टेंबर २०१६ : १६ सप्टेंबरपासून कन्येचा सूर्य षष्टय़स्थानी शुभयोगात येईल. बुधही अनुकूल आहे. मेहनतीस न्याय मिळेल. संयमाने वागाल. नवीन संधी प्राप्त होतील. उद्योग-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. आनंदवार्ता समजतील.

ऑक्टोबर २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. जी कामे हाती घ्याल ती यशस्वी करून दाखवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. मोठय़ांचे मार्गदर्शन मिळेल. धार्मिक मंगलकार्यात भाग घ्याल.

भविष्यकाळाचा जास्त विचार करू नका. भविष्यकाळाचा जास्त विचार केला तर चिंता वाटू लागते. भूतकाळातील दु:खाचे प्रसंग जास्त आठवतात. आपण असतो वर्तमानकाळात! त्यामुळे तेथे मनाची एकाग्रता साधता येत नाही. जे काम कराल ते मनापासून करा. त्यामुळे ते यशस्वी होईल. ग्रहमानाची मदत मिळणारच आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल. कला-क्रीडा क्षेत्रांत नैपुण्य प्राप्त होईल. आत्मविश्वास वाढेल. महिलांना हे नूतन वर्ष खूप चांगले जाईल. आनंद व समाधान प्राप्त होईल.

02-rashi-vrushabवृषभ : उत्तरार्ध चांगला

वर्षांरंभी काही सत्त्वपरीक्षा घेणाऱ्या घटना घडतील. परंतु तुम्ही त्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल. ११ ऑगस्ट रोजी गुरू ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीसाठी तो पंचमस्थानी शुभयोगात येणार आहे. पूर्वार्धातील रेंगाळलेली कामे यशस्वी होण्यासाठी गुरू ग्रह मदत करील. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. या वर्षी आर्थिक बचतीकडे जास्त लक्ष द्याल. नोकरीत बढतीचे योग येतील. महिलांना हे नूतन वर्ष स्वास्थ्य मिळवून देणारे आहे. राहत्या घरासंबंधी काही प्रश्न असतील तर ते सुटू शकतील. वेळेचा आणि संधीचा छान उपयोग करून घ्याल.

डिसेंबर २०१५ : या महिन्यात काही आनंददायक घटना घडतील. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाची चिंता वाटणार नाही. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी प्राप्त होईल. आरोग्यात छान सुधारणा होईल.

जानेवारी २०१६ : मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. कामे मार्गी लागतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. बचतीकडे अधिक लक्ष द्याल. परोपकाराची संधी मिळेल. स्पर्धा, पैजा जिंकाल. शरीरस्वास्थ्य राहील.

फेब्रुवारी २०१६ : प्रत्येक कामात यश मिळेल. संघर्ष टाळून कामे करून घ्याल. आर्थिक येणे वसूल होईल. कौटुंबिक प्रश्न सुटतील. महिलांना गृह व्यवस्थापनात यश मिळेल. अध्ययनात छान यश मिळेल.

मार्च २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. अर्थप्राप्ती होईल. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. नोकरीत अधिकारप्राप्तीचे योग येतील. महिलांना मौल्यवान वस्तू खरेदी करता येईल. आरोग्यात छान सुधारणा होईल. यश मिळेल.

एप्रिल २०१६ : १३ एप्रिलपर्यंत मीनेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. सरकारी तसेच कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. इतरांना मदत, मार्गदर्शन कराल.

मे २०१६ : दैव अनुकूल नाही. मेहनतीत वाढ करावी लागेल. परिस्थितीत प्रयत्न वाढवावे लागतील. दूरदृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. संयम, सावधानता आणि समजूतदारपणा ठेवावा लागेल. आरोग्यावर ताण पडेल.

जून २०१६ : उत्तरार्धात तुळेचा मंगळ अनुकूल होईल. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. धार्मिक कार्यात भाग घ्याल, शरीरस्वास्थ्य राहील, आनंदवार्ता समजतील.

जुलै २०१६ : १६ जुलैनंतर कर्केचा सूर्य अनुकूल होईल. अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. प्रवासयोग येतील. कामे मार्गी लागतील. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. सौख्य लाभेल.

ऑगस्ट २०१६ : मागील काही दिवस खूप ताणतणावाचे गेले. आता परिस्थितीत बदल होतील. ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणारा गुरू पंचमस्थानी शुभयोगात येईल. सर्व प्रश्न सुटतील. अर्थप्राप्ती होईल.

सप्टेंबर २०१६ : बुध, गुरू व शुक्र प्रसन्न आहेत. ग्रहमान उत्तम आहे. छान प्रगती होईल. उद्योग व्यवसायातील गुंतवणूक लाभदायक ठरेल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. आनंदवार्ता समजतील, विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

ऑक्टोबर २०१६ : तुळेचा सूर्य १६ ऑक्टोबरपासून षष्ठस्थानी शुभ योगात येईल. मन:स्वास्थ्य मिळेल. सुखद घटना घडतील. आरोग्य ठीक राहील. इतरांचे छान सहकार्य मिळेल. कलावंतांना मानसन्मान मिळेल.

जी माणसे यशस्वी होतात ती अडचणीत संधी शोधणारी असतात. आणि जीवनात जी माणसे अयशस्वी होतात ती संधी आली असताना अडचणी सांगत बसणारी असतात. तुम्ही इथवर यशस्वीपणे मजल मारली आहे. तुम्ही नेहमी संधीचा शोध घेत असता. प्रयत्नात नेहमी सातत्य ठेवता, त्यामुळेच यशस्वी होत असता. या नूतन वर्षी अशाच संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. इतरांना मदत, मार्गदर्शन कराल. समाजकार्यात भाग घ्याल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. उद्योग व्यवसायात लाभदायक घटना घडतील. प्रसंगावधान दाखवाल. या वर्षांच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. आनंदवार्ता समजतील.

03-rashi-mithunमिथुन : अनुकूलता लाभेल

नूतन वर्षी तुमच्या कार्याला अनुकूलता लाभेल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही यशस्वीपणे करून दाखवाल. व्यवहारी राहून बचतीकडे जास्त लक्ष द्याल. प्रलोभनांपासून संयमाने दूर राहाल. महिलांना स्वत:ची प्रगती साधण्यासाठी संधी प्राप्त होईल. मुलांच्या प्रगतीच्या आनंदवार्ता समजतील. मनोबल वाढविणाऱ्या घटना घडतील. नवीन ओळखींचा छान उपयोग करून घ्याल. कलावंत, क्रीडापटू यांच्याकडून या वर्षी उत्तम कामगिरी घडेल. मानसन्मान प्राप्त होतील.

डिसेंबर २०१५ : अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवीन ओळखी होतील. खर्च वाढला तरी तो योग्य कारणासाठी होईल. वेळेचा छान उपयोग करून घ्याल. आरोग्य ठीक राहील.

जानेवारी २०१६ : धनूचा सूर्य १४ जानेवारी पर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. वेळ व संधीचा योग्य उपयोग कराल. आरोग्य ठीक राहील. मन:स्वास्थ्य मिळेल. अध्ययनात प्रगती होईल.

फेब्रुवारी २०१६ : वृश्चिकेचा शनी शुभयोगात आहे, तो मदत करील. इतर ग्रहमान मात्र तेवढे अनुकूल नाही. मेहनतीत वाढ करावी लागेल. सहनशीलता ठेवावी लागेल. आरोग्य ठीक राहील.

मार्च २०१६ : १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. प्रवास योग येतील. बचतीकडे अधिक लक्ष द्याल. कर्तबगारी दाखविण्याची संधी प्राप्त होईल.

एप्रिल २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. अर्थप्राप्ती होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. कौटुंबिक प्रश्न सुटतील.

मे २०१६ : या महिन्याच्या पूर्वार्धात मेषेचा सूर्य अनुकूल राहील. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. कार्यतत्परता दाखवाल. अर्थप्राप्ती होईल. अनपेक्षित लाभ होतील. यशस्वी व्हाल.

जून २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. जे काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. परोपकाराची संधी प्राप्त होईल. वेळेचा छान उपयोग कराल. आरोग्य छान राहील. महिलांना गृहसौख्य लाभेल.

जुलै २०१६ : मंगळ, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. चिंता करू नका. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. व्यवहारी राहून बचतीकडे अधिक लक्ष द्याल. कार्यक्षमता वाढेल. दैवाची मर्जी राहील. मन:शांती लाभेल. आरोग्य छान राहील.

ऑगस्ट २०१६ : ग्रहमानाची मदत मिळेल. आर्थिक लाभ होतील. त्यामुळे खर्चाचे प्रश्न सुटतील. १६ ऑगस्टपासून सिंहेचा शुक्र अनुकूल होईल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होईल. प्रलोभने टाळाल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील.

सप्टेंबर २०१६ : १६ सप्टेंबपर्यंत सिंहेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग कराल. समाधान देणाऱ्या घटना घडतील. अनपेक्षित लाभ होतील. शरीरस्वास्थ्य राहील.

ऑक्टोबर २०१६ : बुध, शुक्र व शनी अनुकूल आहेत. इतरांशी हितसंबंध सुधारतील. कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल. नवीन जबाबदारी स्वीकाराल. हिंमत दाखवाल. यश मिळेल.

सुख येणे न येणे आपल्या हाती नसते; परंतु सुखी राहणे न राहणे आपल्याच हाती असते. तसेच दु:ख येणे न येणे आपल्या हाती नसते; परंतु दु:खी होणे न होणे आपल्याच हाती असते. जे आपल्या हाती असते त्याचाच आपण विचार करावयास हवा. जे आपल्या हाती नसते त्याचा विचार करणे व्यर्थ ठरते. तुम्ही याप्रमाणेच वागता, त्यामुळे नेहमी आनंदी असता. या वर्षी शनी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. नवीन ओळखी होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. तुमचे निर्णय अगदी योग्य असल्याचे दिसून येईल. अधिकारांचा योग्य वापर कराल. हिंमत दाखवून कामे कराल. या नूतन वर्षी प्रवास योग येईल. आनंददायक घटना घडतील. कौटुंबिक प्रगतीच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगले जाईल. समाधान वाटेल.

04-rashi-karkकर्क : अनपेक्षित फायदा

११ ऑगस्टपर्यंत सिंह राशीतील गुरू अनुकूल राहील. इतर ग्रहमानही उत्तम असल्याने तुमची स्वप्ने साकार होतील. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शनाचा लाभ होईल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. आनंदवार्ता समजतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. गृहसौख्य प्राप्त होईल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल. आरोग्यात छान सुधारणा होईल. कामात उत्साह राहील. मन:स्वास्थ्य राहील.

डिसेंबर २०१५ : वर्षांरंभी काही शुभ घटना घडतील. आनंदवार्ता समजतील. आर्थिक प्रश्न सुटतील. सरकारी कामे मार्गी लागतील. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. आरोग्यात सुधारणा होईल.

जानेवारी २०१६ : सिंहेचा गुरू शुभयोगात आहे. सूर्य, बुध, शुक्र अनुकूल आहेत. आर्थिक लाभ होतील. मनोबल वाढेल. शरीरस्वास्थ्य राहील. कामात उत्साह राहील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल.

फेब्रुवारी २०१६ : पूर्वार्धात मकरेचा सूर्य अनुकूल राहील. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. मोठय़ांचे मार्गदर्शन मिळेल. आनंदवार्ता समजतील. आरोग्यात सुधारणा होईल. कल्पकता दाखवून कामे कराल.

मार्च २०१६ : बुध, गुरू, शुक्र शुभयोगात आहेत. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होईल. आरोग्य ठीक राहील. अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. मने जिंकून घ्याल.

एप्रिल २०१६ : १३ एप्रिलपासून मेषेचा सूर्य अनुकूल होईल. परिस्थितीत सुधारणा होईल. हातून सत्कृत्ये घडतील. व्यवहारी राहून बचत कराल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. वातावरण प्रसन्न राहील.

मे २०१६ : दैव अनुकूल राहील. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. नोकरीत बढतीचे योग येतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. कल्पकता दाखवावी.

जून २०१६ : वृषभेचा सूर्य १४ जूनपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त होईल.

जुलै २०१६ : गुरू-शुक्र शुभयोगात आहेत. प्रिय घटना घडतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. संधीचे सोने कराल. आरोग्यस्वास्थ्य राहील. आर्थिक लाभ होतील.

ऑगस्ट २०१६ : सिंहेचा गुरू ११ ऑगस्टपर्यंत अनुकूल राहील. कामे मार्गी लागतील. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. इतरांची शाबासकी मिळवाल. प्रापंचिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. यश मिळेल.

सप्टेंबर २०१६ : १६ सप्टेंबरपासून कन्येचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. शेती बागायतीमध्ये लाभ होईल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. आरोग्य ठीक राहील. यश मिळेल.

ऑक्टोबर २०१६ : कन्येचा सूर्य १६ ऑक्टोबपर्यंत मदत करील, कार्यक्षमता वाढेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रगती होईल. मन:स्वास्थ्य व शरीरस्वास्थ्य राहील. कल्पकता दाखवून कामे कराल.

माणूस हा माणूस असतो. त्याचे काम चांगले किंवा वाईट असते. इतरांविषयी बोलताना माणसांना वाईट म्हणू नका. त्यांच्या कामाला चांगले किंवा वाईट म्हणा, म्हणजे हितसंबंध बिघडणार नाहीत. तसेच इतरांनी आपणाला वाईट म्हटले ते आपल्याला नसते, आपल्या कामाला असते. कामात चांगली सुधारणा केली की आपणास चांगले म्हटले जाते. नूतन वर्ष आपणास खूप चांगले जाणार आहे. आत्मविश्वास वाढवून कामे करा. ती नक्कीच यशस्वी होतील. प्रवासात कार्यतत्परता दाखवाल. इतरांची मने जिंकून घ्याल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. समाजकार्यात भाग घ्याल. महिलांना स्वत:ची प्रगती साधता येईल. कला-क्रीडा क्षेत्रांत नैपुण्य दाखवू शकाल. नूतन वर्षी काही अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे निर्णय घेऊन कामे पूर्ण कराल. उद्योग-व्यवसायात छान प्रगती होईल. आनंदवार्ता समजतील.

05-rashi-simhaसिंह : प्रगती साधाल

नूतन वर्षी आपली छान प्रगती होणार आहे. ग्रहमान चांगले आहे. पूर्वी न जमलेल्या गोष्टी आता जमू शकतील. विरोधकही चकित होतील. सुसंवाद साधून कामे करून घेण्यावर भर द्याल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. धार्मिक-मंगल कार्यात भाग घ्याल. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. ११ ऑगस्टपासून कन्येचा गुरू धनस्थानी शुभयोगात येईल, तो आपले सर्व प्रश्न सोडवील. मानसन्मान प्राप्त करून देईल. आर्थिक येणे वसूल होईल. दैवाची मर्जी लाभेल. हातून सत्कृत्ये घडतील.

डिसेंबर २०१५ : हे नूतन वर्ष आपणास खूप चांगले जाईल. आनंददायक घटना घडतील. मनोबल वाढेल. उत्साहाने कामे कराल. कार्यक्षमता वाढवाल. इतरांची मने जिंकाल. धनप्राप्ती होईल.

जानेवारी २०१६ : २४ जानेवारीपासून मकरेचा सूर्य अनुकूल होईल. अर्थप्राप्तीत वाढ होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवायला यश मिळेल.

फेब्रुवारी २०१६ : जे काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. ग्रहमान उत्तम आहे. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. इतरांची शाबासकी मिळवाल. आरोग्य ठीक राहील.

मार्च २०१६ : महत्त्वाची सर्व कामे शक्यतो १४ मार्चपूर्वी करून घ्या. ती यशस्वी होतील. कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. बुध शुभयोगात आहे. प्रवास मनाजोगे होतील. शरीरस्वास्थ्य राहील.

एप्रिल २०१६ : या महिन्यात खर्च खूप होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बुध, शुक्र प्रसन्न आहेत. नोकरीत कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण पडेल. मेहनत वाढवावी. संयमाने वागावे.

मे २०१६ : १४ मेनंतर वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. शुक्र शुभयोगात आहे. उद्योग-व्यवसायात प्रगतीची नवीन संधी प्राप्त होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. स्पर्धा, पैजा जिंकाल.

जून २०१६ : ग्रहमान अनुकूल आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र शुभयोगात आहेत. चिंता करू नका. छान यश मिळेल. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित लाभ होतील. आरोग्यात सुधारणा होईल.

जुलै २०१६ : मिथुनेचा सूर्य १६ जुलैपर्यंत मदत करील. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. दैवाची मर्जी राहील.

ऑगस्ट २०१६ : ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणारा गुरू धनस्थानी शुभयोगात येत आहे. आर्थिक येणे वसूल होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. उत्साह वाढेल.

सप्टेंबर २०१६ : गुरू-शुक्र शुभयोगात आहेत. श्री गणेशाची प्रसन्नता राहील. खर्च वाढला तरी तो योग्य कारणांसाठी होईल. प्रिय घटना घडतील. उद्योग-व्यवसायात छान अर्थप्राप्ती होईल. यशस्वी व्हाल.

ऑक्टोबर २०१६ :  १६ ऑक्टोबरपासून तूळेचा सूर्य अनुकूल होईल. आनंदवार्ता समजतील. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. कार्यक्षमता वाढवून कामांचा उरक ठेवाल. आनंद वाटेल.

मन:स्वास्थ्य हे सर्वात महत्त्वाचे असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन:स्वास्थ्य हे श्रीमंती-गरिबीवर कधीही अवलंबून नसते. अनेक श्रीमंत माणसांना मन:स्वास्थ्य नसते. रात्री त्यांना शांत झोप लागत नाही. हे नूतन वर्ष तुम्हाला मन:स्वास्थ्य प्राप्त करून देणारे आहे. तुम्ही मनाची एकाग्रता साधून कठीण कामेही यशस्वी करून दाखवू शकाल. समजूतदारपणा, सहनशीलता आणि संयम यांच्या जोरावर सारे जग जिंकू शकाल. तुमच्यापाशी नेतृत्वगुण उत्तम आहेत. त्या गुणांचा या नूतन वर्षी चांगला उपयोग करून घ्याल. प्रवास मनाजोगे व कार्यसाधक होतील. महिलांना समाधान प्राप्त होईल. कर्तव्यपूर्ती होईल. श्रीगणेशाची प्रसन्नता तुम्हाला लाभेल. या वर्षी तुम्ही इतरांना मदत कराल. अर्थप्राप्ती झाल्याने वाढत्या खर्चाचे प्रश्न सुटतील.

06-rashi-kanyaकन्या : कार्यक्षमता वाढेल

या नूतन वर्षी काही महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत. तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला शाबासकी मिळेल. कार्यक्षमता वाढवून तुम्ही कामाचा उरक ठेवाल. आनंद व समाधान प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी घडतील. अर्थप्राप्ती होईल. परंतु खर्चही तसाच वाढणार आहे. बचत करण्यासाठी सर्व अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अधिकारांचा योग्य वापर कराल. या नूतन वर्षी नवीन ओळखी होतील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. स्वावलंबी होण्याकडे जास्त लक्ष द्याल. कल्पकता दाखवून कामे कराल. महिलांना हे दिवस प्रगतीचे असतील.

डिसेंबर २०१५ : नूतन वर्ष आपणास खूप अनुकूल जाणार आहे. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवावी लागतील. आर्थिक येणे वसूल होईल. इतरांचे देणे फेडाल. आरोग्यस्वास्थ्य टिकून राहील.

जानेवारी २०१६ : वृश्चिकेचा शनी पराक्रमस्थानी शुभयोगात आहे. कल्पकता दाखवून कामे कराल. व्यवहारी राहाल. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. मने जिंकाल.

फेब्रुवारी २०१६ : १३ फेब्रुवारीपासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. व्यवहारी राहाल. आरोग्य छान राहील. बचतीकडे लक्ष द्याल.

मार्च २०१६ : सूर्य, मंगळ, बुध, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. घरात प्रसन्नता राहील. कलाक्रीडा क्षेत्रात मानसन्मान प्राप्त होतील. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी प्राप्त होईल. प्रसंगावधान दाखवाल.

एप्रिल २०१६ : मीनेचा सूर्य १३ एप्रिलपर्यंत मदत करील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल. वेळेचे भान ठेवावे लागेल. छान प्रगती होईल.

मे २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. नोकरी व्यवसायात अनुकूलता राहील. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. प्रवास मनासारखे होतील. आरोग्यात सुधारणा होईल.

जून २०१६ : १४ जूनपासून मिथुनेचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात येईल. नवीन कार्याचा परिचय होईल. अर्थलाभ होतील. इतरांना मदत मार्गदर्शन कराल. आवडत्या छंदासाठी वेळ देऊ शकाल.

जुलै २०१६ :  ग्रहमान उत्तम आहे. दैवाची मर्जी राहील. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही करू शकाल. कर्तव्यपूर्तीचा आनंद प्राप्त होईल. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. यश मिळेल.

ऑगस्ट २०१६ : कर्केचा सूर्य १६ ऑगस्टपर्यंत मदत करील. पूर्वीची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. उद्योगव्यवसायातील आर्थिक येणे वसूल होईल. बचतीकडे अधिक लक्ष द्याल. आरोग्य ठीक राहील.

सप्टेंबर २०१६ : वृश्चिकेत शनी-मंगळ शुभयोगात आहेत. श्रीगणेश सुखकर्ता आहे. तो तुम्हाला सौख्य प्राप्त करून देईल. नवीन ओळखी होतील. मन:स्वास्थ्य मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकाल.

ऑक्टोबर २०१६ : शुक्र व शनी शुभयोगात आहेत. मेहनतीस यश प्राप्त होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यास कामे मिळतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. शरीरस्वास्थ्य टिकून राहील.

आपण सेल्फीने आपला स्वत:चाच फोटो काढतो. तसा माणसाने मनाची सेल्फी वापरून रोज स्वत:च्या मनास तपासले पाहिजे. तुम्ही नेहमी तसे करता. त्यामुळे मनोबल वाढविणे तुम्हाला चांगले जमते. इतरांना मदत-मार्गदर्शन करण्यास तुम्ही सदैव तयार असता. या नूतन वर्षी कौटुंबिक प्रश्न उत्तम प्रकारे सोडवू शकाल. आर्थिक लाभ होतील. येणे वसूल होईल. कार्यक्षमता वाढवून कामांचा उरक ठेवाल. विशेषत: स्वत:च्या चुका दुरुस्त करण्याकडे जास्त लक्ष द्याल. परोपकाराने इतरांची मने जिंकून घ्याल. महिलांना कलाक्षेत्रात स्वत:चा विकास साधता येईल, तसेच गृहव्यवस्थापनात छान यश प्राप्त होईल. नवीन कार्यक्षेत्रांशी परिचय होईल. आनंद प्राप्त होईल.

07-rashi-tulaतूळ : यशस्वी वाटचाल

११ ऑगस्ट २०१६ पर्यंत सिंहेचा गुरू अनुकूल राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. आपली यशस्वी वाटचाल छान प्रगती घडवील. पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची संधी प्राप्त होईल. नोकरीत बढतीचे योग येतील. अधिकारात वाढ होईल. उद्योग-व्यवसायातील आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळवू शकाल. प्रवासयोग कार्यसाधक असतील. नवीन कार्यक्षेत्रांशी परिचय होईल. मानसन्मान प्राप्त होतील. प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होईल. दैवाची मर्जी राहील. काही भाग्यवंतांना अनपेक्षित लाभ होतील. पैजा-स्पर्धा जिंकू शकाल, आरोग्यात छान सुधारणा होईल.

डिसेंबर २०१५ : १६ डिसेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कलावंत, क्रीडापटू, साहित्यिक यांना मानसन्मान प्राप्त होतील, तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. अध्ययन छान चालेल.

जानेवारी २०१६ : १४ जानेवारीपर्यंत महत्त्वाची कामे करून घ्या. सिंहेचा गुरू कर्मस्थानी शुभयोगात आहे. आर्थिक प्रश्न सुटतील, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना कामे मिळतील. अर्थप्राप्ती होईल. व्यवहारी राहाल. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. आरोग्य ठीक राहील.

फेब्रुवारी २०१६ : बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. व्यवहारकौशल्य दाखवाल. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. कार्यक्षमता वाढेल, प्रवास कार्यसाधक होतील. खर्च योग्य कारणांसाठी होईल. आर्थिक लाभ होतील, आरोग्यात सुधारणा होईल.

मार्च २०१६ : १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल. आनंदवार्ता समजतील. नवीन गोष्टी शिकता येतील. समाजकार्य कराल, महत्त्वपूर्ण भेटीगाठी होतील, आरोग्यात सुधारणा होईल, मन:स्वास्थ्य राहील, महिलांना प्रगती साधता येईल.

एप्रिल २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. मेहनतीस न्याय मिळेल, संधीचे सोने कराल, प्रलोभने टाळण्यात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होतील, महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. आर्थिक येणे वसूल होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील, आरोग्य छान राहील.

मे २०१६ : मेषेचा सूर्य १४ मेपर्यंत अनुकूल राहील. प्रवास मनाजोगे होतील, आप्तेष्ट-मित्रांच्या भेटीगाठी होतील, रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल. अध्ययनात छान प्रगती होईल.

जून २०१६ : बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. समाजकार्यात भाग घ्याल. परोपकाराची संधी प्राप्त होईल. आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील, अधिक मोठय़ा यशासाठी प्रयत्न कराल.

जुलै २०१६ : १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. परोपकाराची संधी प्राप्त होईल. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील.

ऑगस्ट २०१६ : सिंहेचा गुरू ११ ऑगस्टपर्यंत मदत करील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. प्रवास मनाजोगे व कार्यसाधक होतील.

सप्टेंबर २०१६ : सिंहेचा सूर्य १६ सप्टेंबपर्यंत अनुकूल राहील. वेळ आणि संधी यांचा योग्य उपयोग करून घ्याल. कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. नवीन ओळखी होतील. आरोग्यात सुधारणा होईल.

ऑक्टोबर २०१६ : मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. प्रगती होईल. आनंदवार्ता समजतील. आप्तेष्ट-मित्रांच्या भेटीगाठी होतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल. शरीरस्वास्थ्य राहील.

कोणतेही काम नीट लक्ष देऊन केले की, लक्ष्य गाठणे सुलभ जाते. आपण प्रत्येक काम अगदी मनापासून करता. कामाला न्याय देत असता. त्यामुळेच इथवर तुमची प्रगती झाली आहे. कुणावर अन्याय होणार नाही यासाठी तुम्ही खूप काळजी घेत असता. विचार करून बोललो तर बोलल्यानंतर जास्त विचारात पडावे लागत नाही. तुम्ही हे पथ्य प्रथमपासून पाळीत आला आहात. हे नूतन वर्ष आपणास बरेच काही मिळवून देणारे आहे. ग्रहमानाची मदत मिळणार आहे.

08-rashi-vruchikवृश्चिक : स्पर्धा जिंकाल

११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणारा गुरू ग्रह लाभस्थानी शुभयोगात येणार आहे. तो प्रगतीसाठी महान संधी प्राप्त करून देईल. उद्योग-व्यवसायात योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. प्रिय घटना घडतील. नोकरीत बढतीचे योग येतील. स्पर्धाजिंकाल. कौटुंबिक प्रश्न इतरांची मने न दुखावता सोडवू शकाल. आप्तेष्ट-मित्रांच्या भेटीगाठी होतील. आनंद वाटेल. इतरांना दिलेला शब्द पाळाल. त्यामुळे पत-प्रतिष्ठा वाढेल. दैवाची मर्जी राहील. महिलांना कलाक्षेत्रात छान प्रगती साधता येईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल.

डिसेंबर २०१५ : मंगळ, बुध, शुक्र शुभयोगात आहेत. आत्मविश्वास वाढेल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश येईल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. योग्य निर्णय घेऊन कृती कराल. आरोग्यात छान सुधारणा होईल. स्पर्धा जिंकाल.

जानेवारी २०१६ : मकरेचा सूर्य १४ जानेवारीनंतर अनुकूल होईल. नवीन ओळखी होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययन छान चालेल. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. स्वास्थ्य राहील.

फेब्रुवारी २०१६ : १३ फेब्रुवारीपर्यंत मकरेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. प्रलोभने टाळण्यात यशस्वी व्हाल. इतरांची मने जिंकून घ्याल. उद्योग-व्यवसायातील गुंतवणुकीवर छान अर्थलाभ होतील.

मार्च २०१६ : या महिन्यात खर्च खूप वाढणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नोकरी-व्यवसायात जबाबदारीने कामे कराल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. प्रवास कार्यसाधक होतील.

एप्रिल २०१६ : १३ एप्रिलपासून मेषेचा सूर्य अनुकूल होईल. अनपेक्षित लाभ होतील. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. प्रसंगावधान दाखवाल. आरोग्य छान राहील. कामात उत्साह राहील.

मे २०१६ : सूर्य, बुध शुभयोगात आहेत. दिलेला शब्द पाळाल. तुमची पत-प्रतिष्ठा वाढेल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य टिकून राहील.

जून २०१६ : महत्त्वाची सर्व कामे १४ जूनपर्यंत करून घ्या, ती यशस्वी होतील. वृषभेचा सूर्य अनुकूल राहील. नोकरीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. बुध व शुक्र शुभयोगात आहेत. कामात उत्साह टिकून राहील.

जुलै २०१६ : बुध, शुक्र शुभयोगात आहेत. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. मात्र मेहनत वाढवावी लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. बेफिकीर राहून चालणार नाही. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

ऑगस्ट २०१६ : मागील काही दिवस खूप ताणतणावाचे गेले. ११ ऑगस्ट रोजी गुरू ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तो लाभस्थानी शुभयोगात येत आहे. आर्थिक प्रश्न सुटतील. वेळेचा छान उपयोग कराल. आरोग्य सुधारेल.

सप्टेंबर २०१६ : सूर्य, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती होईल. इतरांचे देणे फेडू शकाल. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्यावा. आरोग्यात सुधारणा होईल. महिलांना छान प्रगती साधता येईल. यशस्वी व्हाल.

ऑक्टोबर २०१६ : कन्येचा सूर्य १६ ऑक्टोबपर्यंत मदत करील. कामे मार्गी लागतील. पूर्वीच्या चुका सुधारू शकाल. मोठय़ा लोकांचे मार्गदर्शन मिळेल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. यशस्वी व्हाल. गृहसौख्य मिळेल.

तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करीत असता. त्यामुळे इथवर प्रगती तुम्ही केली आहे. मेहनतीत वाढ करणे आणि प्रयत्नात सातत्य ठेवणे याकडे तुमचे अधिक लक्ष असते. नवीन ओळखींचा चांगला उपयोग कराल. या नूतन वर्षी तुमची छान प्रगती होईल. दैवाची मर्जी लाभल्याने तुम्ही पैजा-स्पर्धा जिंकाल. आनंददायक घटना घडतील. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने तुम्ही बचतीकडे अधिक लक्ष देऊ शकाल.

09-rashi-dhanuधनू : यशाचा चढता आलेख

सध्या आपणास ग्रहमानाची सुरेल साथ लाभली आहे.११ ऑगस्टपर्यंत सिंहेचा गुरू अनुकूल राहील. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल. तुमच्या मेहनतीस न्याय मिळेल. मागील वर्षभर तुमची ही विजयी घोडदौड चालू आहे. इतरांचे सहकार्य मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. धार्मिक मंगलकार्यात भाग घ्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. गृहसौख्य लाभेल. राजकारणातील तुमचे डावपेच यशस्वी होतील. प्रवास कार्यसाधक होतील. महिलांना स्वत:ची प्रगती साधण्यासाठी नवीन संधी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना अध्ययनाबरोबरच कलाक्रीडा क्षेत्रातही प्रगती साधता येईल.

डिसेंबर २०१५ : मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. मन:स्वास्थ्य मिळेल. आनंदवार्ता समजतील. सरकारी तसेच कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील.

जानेवारी २०१६ : सिंहेचा गुरू भाग्यस्थानी शुभयोगात आहे. तुमची स्वप्ने साकार होतील. मंगळ-शुक्र अनुकूल आहेत. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत बढतीचे योग येतील. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला लाभ होईल.

फेब्रुवारी २०१६ : १३ फेब्रुवारीपासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल, हिंमत दाखवाल.

मार्च २०१६ : महत्त्वाची कामे १४ मार्चपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. मनोबल वाढविणाऱ्या घटना घडतील. इतरांची शाबासकी मिळवाल. अर्थप्राप्ती होईल.

एप्रिल २०१६ : बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. तुमच्या कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. व्यवहारी राहून बचतीकडे जास्त लक्ष द्याल. समाजकार्यात भाग घ्याल, आनंदवार्ता समजतील. महिलांना मन:स्वास्थ्य मिळेल.

मे २०१६ : १४ मेपासून वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. दैवाची मर्जी राहील. पूर्वीची रेंगाळलेली कामे आता मार्गी लागतील. प्रसन्नता लाभेल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य ठीक राहील.

जून २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. व्यवसाय छान चालेल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होईल. शेती, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. उत्साह वाढेल.

जुलै २०१६ : १६ जुलैपर्यंत मिथुनेचा सूर्य अनुकूल राहील. मंगळ, बुध, गुरू, शुक्र शुभयोगात आहेत. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही पूर्ण करू शकाल. प्रगतीसाठी संधी प्राप्त होतील. आरोग्य छान राहील. मन:स्वास्थ्य प्राप्त होईल.

ऑगस्ट २०१६ : सिंह राशीतील गुरू ११ ऑगस्टपर्यंत शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. नोकरीत अधिकारप्राप्तीचे योग येतील. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल.

सप्टेंबर २०१६ : १६ सप्टेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. परिस्थितीत सुधारणा होईल. सुखकर्ता श्रीगणपती तुम्हाला सौख्य प्राप्त करून देईल. नवीन ओळखी होतील. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. यशस्वी व्हाल.

ऑक्टोबर २०१६ : सूर्य, बुध व शुक्र अनुकूल आहेत. घरात प्रसन्न वातावरण राहील. नोकरी व्यवसायात अनुकूल संधी प्राप्त होतील. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्य छान राहील.

प्रत्येक गोष्ट वेळेत व्हावी यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असता. नूतन वर्षी त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तुम्ही यशस्वी होऊ शकाल. प्रयत्नास यश प्राप्त होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना कामे मिळतील. उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्यास योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. प्रिय घटनांमुळे मनोबल वाढेल. समाजकार्यात भाग घ्याल. प्रत्येक गोष्ट इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. इतरांचे छान सहकार्य मिळेल. महिलांना स्वत:चा विकास साधणे शक्य होईल. या वर्षांचा पूर्वार्ध गुरू अनुकूल असल्याने जास्त चांगला जाईल. इतरांना मदत कराल.

10-rashi-makarमकर : प्रगतीची संधी

वृश्चिकेचा शनी प्रसन्न आहे. नूतन वर्ष आपणास बरेच यश प्राप्त करून देणार आहे. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. इतरांशी सुसंवाद साधून कामे करून घ्याल. राहत्या जागेविषयीचे प्रश्न सुटतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. नूतन वर्षी दूरच्या प्रवासाची संधी प्राप्त करून देईल. ग्रहमानाची साथ मिळेल. इतरांना न मिळालेल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. तुमच्या प्रयत्नास यश मिळेल. मेहनतीस न्याय मिळेल. दैवाची मर्जी लाभेल. मार्गदर्शनाचा लाभ मिळेल.

डिसेंबर २०१५ : १६ डिसेंबपर्यंत वृश्चिकेचा सूर्य अनुकूल राहील. परिस्थिती प्रसन्न राहील. वेळेचा व संधीचा तुम्ही योग्य उपयोग करून घ्याल. नवीन आनंदवार्ता समजतील. आरोग्यात सुधारणा होईल. मन:स्वास्थ्य मिळेल. उमेद वाढेल.

जानेवारी २०१६ : वृश्चिकेचा शनी लाभस्थानी शुभयोगात आहे. तो प्रगती घडवील. कौटुंबिक स्वास्थ्य प्राप्त होईल. उद्योग-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश येईल. आरोग्य छान राहील.

फेब्रुवारी २०१६ : अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाची चिंता राहणार नाही. इतरांचे देणे फेडू शकाल. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्यावा. इतरांची मने जिंकून घ्याल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. शरीरस्वास्थ्य राहील.

मार्च २०१६ : १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल. कामे मार्गी लागतील. दिलेला शब्द पाळाल. पत-प्रतिष्ठा वाढेल. कलावंत, क्रीडापटू यांना मानसन्मान प्राप्त होईल. आवडत्या छंदाला वेळ देऊ शकाल. यशस्वी व्हाल.

एप्रिल २०१६ : १३ एप्रिलपर्यंत मीनेचा सूर्य अनुकूल राहील. संयमाने वागाल. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. तुमची स्वप्ने साकार होतील. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. स्पर्धा-पैजा जिंकाल. यशस्वी व्हाल.

मे २०१६ : मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. जे काम हाती घ्याल त्याचे सोने कराल. उद्योग-व्यवसायातील आपले अंदाज खरे ठरतील. महत्त्वाची कामे करून घ्या. ती यशस्वी होतील. महिलांना आनंदवार्ता समजतील.

जून २०१६ : १४ जूनपासून मिथुनेचा सूर्य अनुकूल होईल. इतरांचे छान सहकार्य मिळेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. प्रवास कार्यसाधक होईल. पूर्वीच्या चुका दुरुस्त कराल.

जुलै २०१६ : सूर्य, मंगळ, बुध, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. घरात प्रसन्न वातावरण राहील. नोकरी-व्यवसायातील स्वप्ने साकार होतील. इतरांशी हितसंबंध सुधारतील. परोपकाराची संधी प्राप्त होईल. यश प्राप्त होईल.

ऑगस्ट २०१६ : ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणारा गुरू भाग्यस्थानी शुभयोगात येत आहे. तो परिस्थितीत अनुकूल बदल करील. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होईल. व्यवहारी राहाल.

सप्टेंबर २०१६ : ग्रहमान उत्तम आहे. दैवाची मर्जी राहील. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. आत्मविश्वास वाढेल. महिलांना गृहसौख्य लाभेल. मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील.

ऑक्टोबर २०१६ : १६ ऑक्टोबरपासून तुळेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. व्यवहारी राहाल. आरोग्य छान राहील.

मन:स्वास्थ्यास कसे जपायचे हे तुम्ही चांगले जाणता! त्यामुळे प्रत्येक प्रसंगातून यशस्वी वाटचाल करता. नूतन वर्षी आपल्या हातून बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील. इतरांचे छान सहकार्य मिळवाल. संघर्ष टाळून कृती कराल. इतरांची मने जिंकून घ्याल. विरोधकही चकित होतील. समाजकार्यात भाग घ्याल. उद्योग-व्यवसायातील कामानिमित्त प्रवास घडतील. ते यशस्वी होतील. अर्थप्राप्ती आणि आर्थिक बचत या दृष्टीने हे नूतन वर्ष खूप चांगले जाईल. कार्यक्षमता वाढवून कामांचा उरक ठेवाल. कलावंतांना हे नूतन वर्ष खूपच चांगले जाईल.

11-rashi-kumbhaकुंभ : प्रसन्नता लाभेल

११ ऑगस्टपर्यंत सिंह राशीतील गुरू ग्रह अनुकूल राहील. ग्रहमान प्रसन्न असल्याने या नूतन वर्षी आपल्याही घरात प्रसन्न वातावरण राहील. वेळेचा आणि संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नवीन कार्यक्षेत्रांशी परिचय होईल. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवू शकाल. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. नवीन मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याची संधी प्राप्त होईल. दैव अनुकूल आहे. जास्तीत जास्त कामे स्वीकारून मोठय़ात मोठे यश संपादन करू शकाल. इतरांची शाबासकी मिळवाल. इतरांना मार्गदर्शन, मदत करून त्यांच्याही जीवनात प्रसन्नता आणाल.

डिसेंबर २०१५ : सूर्य, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. मनोबल वाढविणाऱ्या घटना घडतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. आरोग्य ठीक राहील.

जानेवारी २०१६ : महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. १४ जानेवारीपर्यंत धनूचा सूर्य अनुकूल राहील. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल. आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील. अधिक मोठय़ा यशासाठी प्रयत्न कराल.

फेब्रुवारी २०१६ : सिंहेचा गुरू सप्तमस्थानी शुभयोगात आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. धार्मिक मंगलकार्यात भाग घ्याल. गृहसौख्य लाभेल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील.

मार्च २०१६ : या महिन्यात जमा-खर्चाची स्पर्धा राहील. कोणाला विजयी करायचे ते तुमच्या हाती राहील. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. प्रलोभनांपासून जपावे लागेल. आरोग्यास जपावे.

एप्रिल २०१६ : १३ एप्रिलनंतर मेषेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कार्यक्षमता वाढेल. आप्तेष्ट- मित्रांचे छान सहकार्य मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकाल. महिलांना स्वत:चा विकास साधता येईल.

मे २०१६ : १४ मेपर्यंत मेषेचा सूर्य अनुकूल राहील. परोपकाराची संधी प्राप्त होईल. अधिकारांचा योग्य वापर करून घ्यावा लागेल. कलावंत, साहित्यिक, क्रीडापटू यांना मानसन्मान प्राप्त होतील. आनंद वाटेल.

जून २०१६ : बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही यशस्वी करून दाखवाल. इतरांची शाबासकी मिळवाल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य टिकून राहील. कल्पकतेने कामे करून घ्याल.

जुलै २०१६ : १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. संयमाने इतरांची मने जिंकून घ्याल. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. आरोग्यात छान सुधारणा होईल. मनोबल वाढेल.

ऑगस्ट २०१६ : ११ ऑगस्टपर्यंत सिंहेचा गुरू अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या, ती यशस्वी होतील. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल.

सप्टेंबर २०१६ : १६ सप्टेंबपर्यंत सिंहेचा सूर्य अनुकूल राहील. श्रीगणेशाचा आशीर्वाद आणि छान ग्रहमान तुम्हाला लाभले आहे. आर्थिक लाभ होतील. प्रश्न सुटतील. आरोग्यात सुधारणा होईल.

ऑक्टोबर २०१६ : धनूचा मंगल लाभस्थानी शुभयोगात आहे. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही यशस्वीपणे करून दाखवाल. आर्थिक येणे वसूल होईल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होईल. यश मिळेल.

तुमची राशी ही बुद्धिमंतांची राशी आहे. आपण विद्याव्यासंगी आहात, कल्पक आहात. आपल्या या गुणांना या नूतन वर्षी छान संधी प्राप्त होईल. प्रत्येक गोष्ट कल्पकतेने करण्यात तुम्हाला आनंद प्राप्त होतो. नूतन वर्षी आपण बरीच मोठी कामे करू शकाल. इतरांची शाबासकी मिळवाल. वेळेचे भान पाळाल. नूतन वर्षी हातून मोठी सत्कार्ये घडू शकतील. राहत्या घराविषयी काही प्रश्न असतील तर ते सुटू शकतील. मनोबल वाढविणाऱ्या काही घटना घडतील. या वर्षी प्रवासयोग येतील. हे प्रवास कार्यसाधक व आनंददायी होतील. दूरच्या आप्तेष्ट- मित्रांशी भेटीगाठी होतील.

12-rashi-minमीन : प्रसन्नता लाभेल

तुमचे बरेच जुने प्रश्न या नूतन वर्षी सुटणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणारा गुरू ग्रह त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना कामे मिळतील. उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांना तशी संधी प्राप्त होईल. ज्येष्ठ लोकांचे मार्गदर्शन प्राप्त होईल. संघर्ष टाळून सुसंवाद साधून कामे करून घेण्यावर जास्त भर द्याल. जमीन खरेदी-विक्रीचे रेंगाळलेले व्यवहार पूर्ण होतील. आनंदवार्ता समजतील. प्रसंगावधान दाखवाल. महिलांना छान गृहसौख्य मिळेल, स्वत:ची प्रगती साधता येईल.

डिसेंबर २०१५ : १६ डिसेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. राहून गेलेली, रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. आनंदवार्ता समजतील. आरोग्यात सुधारणा होईल. धन्यता वाटेल.

जानेवारी २०१६ : सूर्य, बुध, शुक्र शुभयोगात आहेत. नोकरीत छान प्रगती होईल. बढतीचे योग येतील, प्रत्येक प्रश्न कौशल्याने सोडवाल. इतरांची मने जिंकून घ्याल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.

फेब्रुवारी २०१६ : १३ फेब्रुवारीपर्यंत मकरेचा सूर्य अनुकूल राहील. उद्योग-व्यवसायात काही महत्त्वपूर्ण घटना घडतील. आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील. अधिक मोठय़ा यशासाठी प्रयत्न कराल. आरोग्य ठीक राहील.

मार्च २०१६ : फक्त बुध-शुक्र अनुकूल आहेत. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. संयम, सहनशीलता आणि सावधानता ठेवावी लागेल. विरोधकांवर नजर ठेवावी लागेल. दक्षता घ्यावी लागेल.

एप्रिल २०१६ : अजूनही ग्रहमान अनुकूल नाही. मेहनत करावी लागेल. प्रलोभनांपासून जपावे लागेल. संघर्ष टाळावा लागेल. परिणामांचा विचार करून कृती करावी. संयमाने वागावे. कामाचा ताण वाढेल. आरोग्यास जपावे.

मे २०१६ : १४ मेपासून वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. नोकरीत बढतीचे योग येतील. परिस्थितीत अनुकूल बदल होतील. व्यवहारी राहून बचतीकडे जास्त लक्ष द्याल. प्रापंचिक प्रश्न सुटतील. आरोग्य सुधारेल.

जून २०१६ : १४ जूनपर्यंत वृषभेचा सूर्य अनुकूल राहील. कामात उत्साह राहील. व्यवहार-कौशल्य दाखवाल. इतरांना मदत-मार्गदर्शन कराल. सरकारी कामे मार्गी लागतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आनंद वाटेल.

जुलै २०१६ : बुध-शुक्र शुभयोगात आहेत. परिस्थितीत सुधारणा होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. शेती-बागायतीमध्ये लाभ होईल. शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होईल.

ऑगस्ट २०१६ : मागील काही दिवस खूप ताणतणावाचे गेले. आता गुरू ग्रह ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करीत आहे. तो मीन राशीसाठी खूप अनुकूल आहे. तुमचे प्रश्न सुटतील. आरोग्य सुधारेल.

सप्टेंबर २०१६ : सूर्य, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. दैवाची मर्जी राहील, आर्थिक येणे वसूल होईल. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होईल. समाधान लाभेल.

ऑक्टोबर २०१६ : १६ ऑक्टोबपर्यंत कन्येचा सूर्य अनुकूल राहील. तुम्ही जे काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. घरात प्रसन्नता राहील. संधीचे सोने कराल. शरीरस्वास्थ्य राहील.

हे नूतन वर्ष आपणास मोठे यश मिळवून देणारे ठरणार आहे. मागील काही वर्षांपासूनची अपुरी राहिलेली स्वप्ने साकार करून देणारे हे वर्ष आहे. कन्या राशीत प्रवेश करणारा गुरू ग्रह कौटुंबिक प्रश्न सुटण्यास मदत करील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नवीन कार्यक्षेत्रांशी परिचय होईल. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक ठेवाल. स्पर्धा-पैजा जिंकण्याची संधी प्राप्त होईल. साहित्यिकांना, कलावंतांना नवीन कल्पना सुचतील. सर्जनशीलतेचा अनुभव येईल. महिलांना व्यवहारी राहून बचत करता येईल. विद्यार्थ्यांना छान यश मिळेल. मनीची स्वप्ने साकार होतील.
ज्योतिर्विद – आदित्य भारद्वाज

 

First Published on February 8, 2016 10:45 am

Web Title: loksatta diwali 2015 issue yearly horoscope
टॅग Astrology,Diwali
Next Stories
1 आनंदवन समाजभान अभियान
Just Now!
X