नवी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे एरोलीतील नगरसेवक एन. के. मढवी यांच्या कार्यकर्त्यांनी पामबीच येथील अक्षर चौकात सुसाट वाहने चालवून धुमाकूळ घातला. याबद्दल जाब जाब विचारणाऱ्या काही नागरिकांवर कार्यकर्त्यांनी पिस्तुल रोखल्याची घटना घटना घडल्याने परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते.
या प्रकाराबद्दल काही जणांनी थेट नगरसेवक मढवी यांच्याकडे तक्रार मांडली; परंतु मढवी यांनी झालेल्या प्रकाराबाबत म्हणणे ऐकून न घेता नवी मुंबईत असेच चालते, तुम्हाला चालवून घ्यावे लागेल, असे ‘उत्तर’ देऊन नागरिकांची बोळवण केली. त्यामुळे नाराज झालेल्या तक्रारदारांनी एन. आर. आय. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संजयकुमार लोहारिया असे तक्ररदाराचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी सांगितले. महामार्गावर मढवी यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या धुमाकुळाचा फटका या मार्गावरुन चालणाऱ्या इतर वाहनांना झाला. मढवी यांच्या कार्यकर्त्यांनी पिस्तुल रोखल्याचे संजय यांनी तक्रारीत म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2015 6:12 am