तालुक्यातील विविध रस्ते तसेच पुलासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ६१ लाख ७० हजार रूपये मंजूर  झाले असल्याची माहिती आमदार विजय औटी यांनी दिली. या कामांमध्ये भाळवणी ते भांडगांव रस्त्यावर सिना नदीवरील सेतूपुलासाठी ३४ लाख ५९ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
    पारनेर ते सिद्धेष्वरवाडी रस्त्यासाठी ५५ लाख ६५ हजार, राज्यमार्ग ते पुणेवाडी रस्त्यासाठी ४० लाख ९० हजार, टाकळी ढोकेश्वर  ते ढोकेश्वर  मंदिर  रस्त्यासाठी ३० लाख ५६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तीनही रस्त्यांची मोठी दुरावस्था झाल्याने या रस्त्यांच्या मजबुतीकरण तसेच डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. औटी यांनी पाठपुरावा केला होता. या रस्त्यांच्या नूतनीकरणाची नागरीकांची मागणी होती. नियोजन मंडळामार्फत या कामांना मंजुरी मिळविण्यासाठी आ. औटी यांनी विशेष  प्रयत्न केले. भाळवणी ते भांडगाव रस्त्यावरील सिना नदीवरील पुलासाठी तेथील नागरीकांनी आतापर्यंत अनेकदा पाठपुरावा केला होता. परंतू त्यांच्या अनेक वर्शाच्या पाठपुराव्यास यश येत नव्हते. या नदीवर पूल  नसल्याने पावसाळयात नागरिकांचे मोठे हाल होत होते. भांडगावच्या नागरिकांनी आपली कैफियत आ. औटी यांच्यापुढे मांडल्यानंतर त्यांनी या कामासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
    भांडगावच्या नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे औटी यांनी नियोजन मंडळाच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. औटी यांनी अनेक वर्शाचा हा प्रश्न मार्गी लावल्याबददल माजी सरपंच दत्ता खरमाळे, तान्हाजी पवार, गुलाबराव खरमाळे, बाळासाहेब होले, अशोकराव गायकवाड, मिच्छद्र खरमाळे, बाळासाहेब पवार तसेच संतोश खरमाळे यांनी औटी यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. औटी यांनी खरमाळे व त्यांच्या सहकार्याकडे कामाच्या मंजुरीचा आदेश सुपुर्द केला.