News Flash

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ‘मुख्यमंत्री मदत निधी’ला १ कोटींची मदत

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांतर्फे हा धनादेश देण्यात आला.

राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचीही आवश्यकता आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुख्यमंत्री मदत निधीला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे १ कोटी रूपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी हा धनादेश उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

करोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्यावतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या लढ्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील २ हजार ५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ ‘साठी १ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. या जमा केलेल्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपुर्द केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 12:28 pm

Web Title: 1 crore rupees assistance to the chief ministers relief fund from the employees of the state excise department corona jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
2 हिंगोलीत SRPF च्या ४१ जवानांना करोनाची लागण
3 राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम – संजय राऊत
Just Now!
X