News Flash

कशेडी घाटातील अपघातात १ ठार; ५ जखमी

कशेडी घाटात भोगाव येलंगेवाडी येथील वळणाच्या उतारावर ही घटना घडली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात १ जण ठार तर ५ जण जखमी झाले. ट्रेलरच्या धडकेने स्विफ्ट दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. जखमींपकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
कशेडी घाटात भोगाव येलंगेवाडी येथील वळणाच्या उतारावर ही घटना घडली. गोव्याकडून येणारा ट्रेलर (एमएच ०४ जीसी ४५२७) याची मुंबईकडून येणाऱ्या स्विफ्ट व्हीडीआय कार (क्र. एमएच १२ एचव्ही ६८४४) ला जोरदार धडक बसली. यानंतर दोन्ही वाहने बाजूला असलेला दगडी संरक्षक कठडा तोडून सुमारे २५-३० फूट खोल दरीमध्ये कोसळली.
या अपघातात राजकुमार ऊर्फ राजेन्द्र तुकाराम वराट (४८, रा.पाषाण, पुणे) हा डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा होऊन जागीच ठार झाला. या स्विफ्ट कारमधील विजय एकनाथ शहाणे (४६, नवी सांगवी, पुणे), सुशांत विजय शहाणे (१६), उषा विजय शहाणे (३८), कावेरी राजकुमार वराट (३५ रा. पाषाण, पुणे) आणि श्रावणी राजकुमार वराट (६) हे पाच प्रवासी जखमी झाले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार करण्यात येऊन पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
या जखमींपकी उषा शहाणे या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिन्मयी मिश्रा आणि डॉ. राजेश सलागरे यांनी सांगितले.
पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक बी. टी. महाजन, नाना म्हात्रे, िपगळे, सावंत, गुनमान आणि गोडगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दरीतून ट्रेलर आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. या अपघातानंतर ट्रेलरचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या अपघाताबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार सावंत अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:44 am

Web Title: 1 dead 5 injured in kashedi ghat accident
Next Stories
1 विद्यार्थ्यांनी स्मार्ट होणे गरजेचे – सतीश सावंत
2 विद्यार्थ्यांची आत्महत्या
3 हेल्मेट सक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठी- राज ठाकरे
Just Now!
X