News Flash

एस.टी.ची मोटारीला धडक; कवठेमहांकाळजवळ १ ठार

कवठेमहांकाळ नजीक लांडगेवाडी येथे एस.टी.बस व मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण ठार तर ३ जण जखमी झाले.

| May 22, 2014 03:36 am

कवठेमहांकाळ नजीक लांडगेवाडी येथे एस.टी.बस व मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण ठार तर ३ जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी झालेल्या या अपघातातील जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
सांगलीतील काळे कुटुंबीय मारुती कार (एम एच ०४ डीसी १३००) मधून जतहून सांगलीकडे येत होते. त्याचवेळी मिरजेकडून पंढरपूरला जाणाऱ्या बस (एम एच १२ सीएच ७९५२) या वाहनाशी धडक झाली. यामध्ये रुद्राप्पा शिदलिंग काळे हा जागीच ठार झाला. या अपघातात आण्णा काळे, विठ्ठल काळे व सचिन काळे हे तिघे जण जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 3:36 am

Web Title: 1 killed near kavathemahankal in st accident 2
Next Stories
1 दोन बसची धडक; १ ठार, ८ जखमी
2 पत्नी, सासूच्या छळास कंटाळून तरुणाची विष पिऊन आत्महत्या
3 खंडणीसाठी चिमुकलीसह आठ वर्षांच्या मुलीचा खून
Just Now!
X