News Flash

टँकर-प्रवासी रिक्षा अपघातात उस्मानाबादजवळ १० ठार

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर शहराजवळ तुरोरी गावाजवळ टँकरने सहा आसनी रिक्षाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील १० जण ठार तर चारजण गंभीररीत्या जखमी झाले

| June 28, 2015 05:53 am

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर शहराजवळ तुरोरी गावाजवळ टँकरने सहा आसनी रिक्षाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील १० जण ठार तर चारजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
शनिवार तुरोरी गावाचा आठवडी बाजार होता, हा बाजार करून गावाकडे काही लोक सहा आसनी रिक्षामधून जात होते. या वेळी हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका टँकरने अन्य एका रिक्षाला चुकवण्याच्या प्रयत्नात या प्रवाशांनी भरलेल्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात १० जण ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. खाजा रहिमान मासुलदार (५०, रा. तलमोड ता उमरगा), सोनुबाई नरसाप्पा सास्तुरे ( ५५, रा. धाकटीवाडी, ता. उमरगा), प्रकाश पांडुरंग मंडले (२१, रा. तुरोरी, ता. उमरगा), विष्णू नंदकुमार भोसले (२०, रा. तुरोरी, ता उमरगा), सुकुमारबाई पांडुरग बंडगर (५०, रा. बंडगरवाडी), राहयाबाई आगजी हाके (६०, रा. बंडगरवाडी), व नंदनी निवृत्ती बोधे (पाच महिने, रा. बंडगरवाडी) हे सात जण जागीच ठार झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 5:53 am

Web Title: 10 killed in road accident at usmanabad
Next Stories
1 कर्जमुक्ती आंदोलनाला यवतमाळमध्ये प्रतिसाद
2 अतिक्रमणाबद्दल दर्डा कुटुंबियांना दंड
3 शेतातील रस्त्याच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला
Just Now!
X