सोलापूरपासून सुमारे १२० किलो मीटर अंतरावर कर्नाटकात हुमणाबाद येथे तवेरा मोटार व टँकर यांची रविवारी पहाटे टक्कर होऊन तवेरा गाडीतील दोन कुटंबीयांतील १० जण मृत्युमुखी पडले. या अपघातातील सर्व मृत पन्हाळा तालुक्यातील शहापूरचे रहिवासी आहेत.
हैदराबाद येथील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी शहापूरचे महिपती शेटे व त्यांचे नातेवाईक श्यामराव शंकरराव जाधव हे आपल्या कुटुंबीयांसह निघाले असता वाटेत त्यांच्यावर काळाने झडप घातली. यातील नऊजण जागीच ठार झाले, तर एका मुलीचा वाटेत अंत झाला. या अपघातात महिपती ज्ञानेश्वर शेटे ( ६०), शहाजी बळवंत शेटे (३४), अर्चना विजय शेटे (३२), त्यांचे पती विजय जयवंत शेटे (३८), मुलगा अभिषेक शेटे (८) व मुलगी वैष्णवी (६) असे संपूर्ण कुटुंबच अपघातात बळी पडले.
याशिवाय कुसुम जाधव (५०) व त्यांचे पती श्यामराव जाधव (५५) यांच्यासह लखन अशोक चव्हाण (२२) व विश्वास नारायण ( ४२) यांनाही काळाने हिरावून घेतले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 2:45 am