25 February 2021

News Flash

दिलासादायक! रायगडमधले १० हजार जण करोनामुक्त

जिल्ह्यात सध्या ३ हजार ४५९ करोनाबाधित रुग्ण

लोकसत्ता, खास प्रतिनिधी

अलिबाग- रायगड जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील १० हजार जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४६९ करोनाचे रुग्ण आहेत. तर आत्ता पर्यंत ३८० जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

मंगळवारी दिवसभरात ३३३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ३८४ जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले. दिवसभरात १२ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४ हजार ०७५ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ३३३ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील २०१, पनवेल ग्रामिण मधील ४०, उरण मधील ५, खालापूर २६, कर्जत ११, पेण २०, अलिबाग ८, रोहा १८, सुधागड १, म्हसळा १, महाड २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत २, उरण २, खालापूर १, कर्जत ४, अलिबाग १, महाड १ अशा १२ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३८४ जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ४५ हजार ३८६ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४५९ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४५४, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४००, उरण मधील १६३, खालापूर ३१४, कर्जत १०२, पेण २६४, अलिबाग २३४, मुरुड ४७, माणगाव ८७, तळा येथील १, रोहा १४३, सुधागड १२, श्रीवर्धन २७, म्हसळा ७०, महाड १२६, पोलादपूर मधील १५ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७३ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 8:37 pm

Web Title: 10 thousand corona patients got discharged in raigad till today scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी हनी बाबू अटकेत
2 मराठा आरक्षण सुनावणीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
3 चंद्रपूर : गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ४ ऑगस्टला शाळा सुरू करणार – वडेट्टीवार
Just Now!
X