01 October 2020

News Flash

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात १०० कोटी देणार – धनंजय मुंडे

१३ कोटींचे ८ दिवसात वितरण

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात १०० कोटी रूपये मिळवून देण्यात येतील तसेच त्यातील १३३ नवउद्योजकांना आठ दिवसांत १२.९८ कोटींचा मार्जिन मनी वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या या प्रकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील १३३ नवउद्योजकांना मार्जिन मनी मिळण्याबाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजकांसाठी असलेल्या योजनांबाबत आढावा बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष कांबळे, रवी घाटे, सदस्य अनेक लघुउद्योगांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना कोणत्या प्रकाराचे लघुउद्योग सुरू करता येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य यांचा कृतीआराखडा तयार करण्यासाठी विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, डिक्कीचे प्रतिनिधी, लीड कॉमचे प्रतिनिधी तसेच बँकर्स यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे. समिती कृतीआराखडा तयार करून पुढील बैठकीत अहवाल सादर करेल. जिथे कच्चा माल उपलब्ध असेल तिथे त्याचे उत्पादन करून मोठ्या महानगरात बाजारपेठ उपलब्ध करणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न केला जाईल. १५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंतचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी १५ टक्के मार्जिन मनी वितरीत करण्यात येईल.

तालुकास्तरावर नवउद्योजकांमार्फत सेवा व उत्पादन पुरविणारी साखळी निर्माण करून त्यातूनच हे नवउद्योजक तयार करणार, डिक्कीच्या सहकार्याने अनुसूचित जातीसाठी आर्थिक विकासाच्या योजना राबवण्यात येऊन अनुसूचित जातीचा आर्थिक व सामाजीक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच डिक्की व लीडकॉम यांच्या सहकार्याने चर्मोद्योगाला चालना देण्यात येणार आहे. स्टॅड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत NOGA, MAIDC, BVG, A Store लीडकॉम शॉपी, ले धारावी या लघुउद्योग कंपन्यांनी आपले सादरीकरण सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 9:11 pm

Web Title: 100 crore will be given to sc entrepreneurs in a year says dhananjay munde aau 85
Next Stories
1 वर्धा रेल्वे स्थानकातील मालधक्याच्या वेळेत बदल; कामगारांना दिलासा
2 तुळजाभवानीचे मंदिर खुले करण्याच्या हालचाली; भाविकांच्या सुरक्षिततेबाबत लवकरच येणार अहवाल
3 संदीप सिंह व भाजपातील संबंधाचीही होणार सीबीआय चौकशी?; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
Just Now!
X