News Flash

पंढरपुरात १०० फुटाहून अधिक उंचीची विठठ्ल मूर्ती उभारणार नितीन चंद्रकांत देसाई

ज्या भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी ही मूर्ती उभारणार असेही देसाई यांनी म्हटले आहे

संग्रहित छायाचित्र

मंदार लोहकरे, प्रतिनिधी

पंढरपुरात १०० फुटांपेक्षा जास्त उंचीची विठ्ठल मूर्ती कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई उभारणार आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेल्या भक्तांसाठी हा वेगळा प्रयोग पंढरपुरात करायचे ठरवले आहे, असे नितीन चंद्रकांत देसाई यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारता येईल का? अशी संकल्पना त्यांनी माझ्यापुढे मांडली. त्यानंतर १०० फुटांपेक्षा जास्त उंचीची विठ्ठल मूर्ती साकारणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.

जगातला सर्वात मोठा स्टुडिओ उभारणारे नितीन चंद्रकांत देसाई यांनी आता पंढरपुरात १०० फुटांपेक्षा जास्त उंचीची विठ्ठल मूर्ती उभारणार आहेत. पंढरपुरातल्या मंदिरात जशी मूर्ती आहे तशीच ही मूर्ती साकारण्याचा आपला प्रयत्न असेल असंही देसाई यांनी स्पष्ट केलं. त्याचसाठी आपण पंढरपुरात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्या भाविकांना पंढरपुरात येऊनही विठूरायाचे दर्शन घेता येत नाही अशा सगळ्याच भाविकांसाठी ही मूर्ती उभारण्याचा आपला विचार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विठ्ठलाची १०० फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती कुठे उभारायची याची जागा अद्याप निश्चित व्हायची आहे. लवकरच ही प्रक्रिया पार पडेल असा विश्वास डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला. १०० फुटांपेक्षा जास्त उंचीची विठ्ठल मूर्ती उभारल्यानंतर पंढरपूरच्या सौंदर्यात भर पडेल असाही विश्वास राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 1:06 pm

Web Title: 100 feet vitthal murti will build in padharpur says nitin chandrkant desai scj 81
Next Stories
1 सुषमा मला ‘शरद भाऊ’ म्हणायच्या, पवारांची भावनिक प्रतिक्रिया
2 कोल्हा’पुरात’ परिस्थिती गंभीर; नौदलाची पथके मदतीसाठी दाखल
3 पूरग्रस्तांची ना विचारपूस, ना मदतीचा हात
Just Now!
X