News Flash

श्रद्धांजली : १०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान

डॉ वसंत देसाई यांचे वैशिष्ट्य म्हणजे १९६६च्या हनुमान एक्सपिडिशनमध्ये ते डॉक्टर म्हणून सहभागी झाले होते

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबईतील गिहीविहार या ट्रेकर्सच्या क्लबशी संबंधित असलेले व शंभरी गाठलेले ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे काल निधन झाले आहे. विश्वास देसाई यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही बातमी ट्रेकर्सना व दुर्गप्रेमींना कळवली आहे. डॉ वसंत देसाई यांचे वैशिष्ट्य म्हणजे १९६६च्या हनुमान एक्सपिडिशनमध्ये ते डॉक्टर म्हणून सहभागी झाले होते.

गिरीविहारचे माजी अध्यक्ष महेश देसाई जे स्वत: या मोहिमेचे भााग होते त्यांनी सांगितले की डॉ देसाई नंतरही १९७३ मध्ये राजरंबा चौदराच्या एक्सपिडिशनमध्ये डॉक्टर म्हणून सहभागी झाले. परंतु हिमालयाची व सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांची आवड असलेले देसाई केवळ डॉक्टर नव्हते तर ट्रेकर होते व दुर्गप्रेमी होते. गिरीविहाारच्या सुरुवातीच्या काळापासून ते संस्थेशी संलग्न होते. गिरीविहारला वेळोवेळी मदत करणाऱ्या डॉ देसाईंनी जेव्हा गरज पडली तेव्हा आपला संपर्क वापरून आर्थिक मदत मिळवून देण्यातही पुढाकार घेतला होता अशी आठवण महेश देसाईंनी सांगितली.

वयाची शंभरी गाठलेल्या डॉक्टरांना रोज चालण्याची सवय होती. हिमालय व सह्याद्रीमध्ये असंख्य ट्रेक केलेल्या डॉ देसाईंची जीवनशैली अत्यंत आदर्श होती. योगविद्येबरोबरच योग्य तो व्यायाम व आहारावर त्यांचा कटाक्ष होता. मुंबईतल्या सगळ्यात जुन्या अशा ट्रेकरपैकी एक असलेल्या डॉ वसंत देसाईंना ट्रेकर्सनी अभिवादन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 9:32 am

Web Title: 100 year old trekker dr vasant desai dies
Next Stories
1 लोकलमधल्या ‘त्या’ टवाळखोर स्टंटबाजांना शोधलं, पोलिसांनी घातल्या बेड्या
2 संजय किर्लोस्करांची भावांविरोधात कोर्टात धाव, ७५० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा
3 चाकण हिंसाचार प्रकरणी अटकसत्र सुरू, २० जण पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X