महाराष्ट्रात २४ तासात १००८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. आज १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत १८७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

२४ तासांमध्ये झालेल्या २६ करोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी १० मृत्यू पुण्यात, ५ मुंबईत, ३ जळगावात, १ पुणे जिल्ह्यात, १ सिंधुदुर्गमध्ये, १ नांदेडमध्ये, १ भिवंडीत, १ ठाण्यात, १ औरंगाबाद आणि १ मृत्यू परभणीत झाला आहे. मुंबईतील एका उत्तर प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू नोंदवला गेला आहे.

मृत्यू झालेल्या २६ रुग्णांमध्ये १८ पुरुष तर ८ महिला होत्या. यातले १४ जण हे ६० वर्षांच्या वरील वयाचे होते. यातले ११ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. २६ पैकी १५ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे गंभीर स्वरुपाचे आजार होते.