15 January 2021

News Flash

मुंबईत सेवा देऊन परतलेल्या सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

एकूण ४२५ कर्मचारी बेस्टला मदत करण्यासाठी मुंबईला गेले होते

(संग्रहित छायाचित्र)

सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असल्याने एसटी प्रशासनाची चिंता वाढली आहे. हे सर्व कर्मचारी मुंबईमध्ये सेवा देऊन परतले होते. एकूण ४२५ कर्मचारी हे बेस्टला मदत करण्यासाठी मुंबईला गेले होते. यापैकी १०६ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनासमोर नवं आव्हान आहे. लॉकडाउनमध्ये बंद असलेली एसटी सेवा राज्य सरकारकडून पूर्ववत करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेत जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यासाठी मुभा दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेल्यांमध्ये नऊ डेपोंमधील चालक आणि वाहकांचा समावेश आहे. मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने संपूर्ण ताण बेस्टवर पडत होता. यासाठी राज्यातील मुख्य बस डेपोंमधून बसेस मागवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक एसटी कर्मचारी मुंबईत सेवा देत होते. सेवेचा कालावधी संपल्यानंतर कर्मचारी पुन्हा आपल्या जिल्ह्यात परतले असता त्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं.

मुंबईत सेवा देण्यासाठी एकूण २०० चालक, वाहक आणि २५ अन्य कर्मचारी गेले होते. बेस्टला मदत करण्यासाठी या सर्वांनी हजेरी लावली होती. यामध्ये नऊ डेपोतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

आगार बाधित
सांगली – ६
मिरज – ६
इस्लामपूर – ६
विटा – १४
आटपाडी – १५
जत – १५
कवठेमहांकाळ – १४
तासगाव – २४
शिराळा – १६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 10:00 am

Web Title: 106 st employess found covid positive in sangli sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण
2 मराठा आरक्षण प्रकरणी आज सुनावणी, स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार असल्याने आश्चर्य व्यक्त
3 पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल
Just Now!
X