कासा : १०८ या रुग्णवाहिकेची मदत मिळविण्यासाठी  दिवसाकाठी  शेकडो दूरध्वनी येत आहे. गेले काही दिवस ही रुग्णवाहिका बंद पडल्याची तक्रार काही नागरिकांनी केली.

रुग्णवाहिकेतील ठोके मोजणारी यंत्रणा पाच दिवसांपासून बंद पडली आहे. तरीही जखमी रुग्णाला घेऊन रुग्णालय गाठले जात आहे. अशा अवस्थेत एखादा गंभीर जखमी रुग्णाला घेऊन जात असताना या यंत्रणेची गरज भासल्यास करायचे काय, हा सवाल केला जात आहे. गाडीची चाके खराब अवस्थेत आहेत. त्यातील हवा निघत आहेत.

त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.रुग्णवाहिकेचा सायरनही बंद आहे. याबाबत डॉक्टरानी अनेकदा तक्रार केली आहे, परंतू प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण व हलगर्जीचा त्रास सामान्यांना  सहन करावा लागत आहे. डहाणू नाशिक रोडवर वेती येथे लग्नकार्य आटोपून विRमगड सातखोर येथे जाणारा पिकअप पलटी होऊंन अपघात झाल्याने  अपघातात एकाचा मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले, जखमींपैकी एकाला वलसाड येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी  १०८ क्रमाकांवर संपर्क साधला असता केळवा माहिम येथील रुग्णवाहिका उपलब्ध झाली खरी पण ती नादुरुस्त होती, असे जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले. रुग्णवाहिकेतील पल्स रेट काऊंट करणारी यंत्रणा पाच महिन्यांपासून बंद आहे. तसेच रुग्णवाहिकेची चाकेही खराब असल्याचे डॉ. अल्ताफ मन्सुरी  यांनी सांगितले.