03 March 2021

News Flash

खेडजवळ क्वालिसच्या अपघातात ११ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ रविवारी रात्री क्वालिस आणि ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ११ जण मृत्युमुखी पडले.

| June 24, 2013 10:51 am

मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ रविवारी रात्री क्वालिस आणि ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ११ जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
क्लालिस गाडी संगमेश्वरहून मुंबईकडे निघाली होती. त्याचवेळी खेडकडून चिपळूणकडे निघालेला वाळूच्या ट्रकची आणि क्वालिसची समोरासमोर टक्कर झाली. समोरासमोर टक्कर झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी क्वालिसमध्ये अडकलेल्यांना गाडीतून बाहेर काढले. कटरच्या साह्याने गाडीचे पत्रे कापून त्यामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 10:51 am

Web Title: 11 person died on mumbai goa highway near khed in an accident
Next Stories
1 बंधाऱ्यात बुडून चार बहिणींचा मृत्यू
2 परभणीच्या २५ यात्रेकरूंचा अजूनही पत्ता नाही
3 इंदापूरमध्ये बँकेत साडेतीन कोटींचा दरोडा
Just Now!
X