24 November 2020

News Flash

राज्यात दिवसभरात आढळले ११ हजार ८५२ नवे रुग्ण

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही अंशतः वाढ

(संग्रहित छायाचित्र)

करोना विषाणूचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र राज्यासाठी सोमवारचा दिवस काहीसा संमिश्र ठरला आहे. दिवसाअखेरीस राज्यात ११ हजार ८५२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याचसोबत आज दिवसाअखेरीस ११ हजार १५८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही अंशतः वाढ झालेली असून हा आकडा आता ७२.०४ वरुन ७२.३७ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

आज निदान झालेले ११,८५२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले १८४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-११७९ (३२), ठाणे- २२१ (१०), ठाणे मनपा-२०७ (९), नवी मुंबई मनपा-३०४ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५९ (१), उल्हासनगर मनपा-५५ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-१३२, पालघर-८२ (२), वसई-विरार मनपा-१५९ (१), रायगड-२७२, पनवेल मनपा-१९१ (१), नाशिक-२०२ (१), नाशिक मनपा-६५१ (२), मालेगाव मनपा-४२, अहमदनगर-१८० (२),अहमदनगर मनपा-५७ (१), धुळे-११३ (२), धुळे मनपा-६८ (१), जळगाव- ४६२ (१०), जळगाव मनपा-१४४ (१), नंदूरबार-१०५, पुणे- ४६४ (२), पुणे मनपा-८७५ (७), पिंपरी चिंचवड मनपा-५९२, सोलापूर-२२२ (३), सोलापूर मनपा-४४ (१), सातारा-४२२(७), कोल्हापूर-३२० (१५), कोल्हापूर मनपा-१९६ (४), सांगली-४४६ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-३०१ (१), सिंधुदूर्ग-१३६, रत्नागिरी-८२ (१), औरंगाबाद-१९३ (२),औरंगाबाद मनपा-१८८ (२), जालना-९३ (२), हिंगोली-५९, परभणी-३९, परभणी मनपा-३९, लातूर-१२१ (३), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१३२ (६),बीड-९४ (३), नांदेड-१२५ (४), नांदेड मनपा-१४९ (४), अकोला-३, अकोला मनपा-७, अमरावती-३२, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-३७ (३), बुलढाणा-६६ (१), वाशिम-४ (१) , नागपूर-१५६ (३), नागपूर मनपा-६४५ (१२), वर्धा-५, भंडारा-२३, गोंदिया-२९ (१), चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-१११ (१), गडचिरोली-६, इतर राज्य १२.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९३९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 9:21 pm

Web Title: 11 thousand 852 new covid 19 patients found in maharashtra today informs health minister rajesh tope psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 राज ठाकरेंचा शिवसेनेला धक्का, सात शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश
2 वाई चे आमदार मकरंद पाटील करोना बाधीत
3 चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्याला पूराचा सर्वाधिक फटका
Just Now!
X