24 October 2020

News Flash

Coronavirus : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १११९ करोनाबाधित

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने ओरोस सिंधुदुर्गनगरी क्रिडाभवन येथे आणखी शंभर खाटांचे कोवीड केंद्र उभारण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सौम्य लक्षणे आढळल्यास रुग्णांना गृह अलगिकरणात उपचार करण्यात येत आहे.

जिल्ह्यात शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण एक हजार ७६१ करोनाबाधित रुग्ण तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक हजार ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शनिवारी आणखी १५ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या २ हजार ९३८ च्या घरात पोहोचली आहे. यातील सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ११९ झाली आहे. तर करोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेली कोवीड हॉस्पिटल व खासगी दवाखाने मिळून ८४० एवढी बेड संख्या जिल्ह्यात आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात उभारण्यात आलेले बेड आता रुग्णांना दाखल करून घेण्यास कमी पडत आहेत. परिणामी जिल्ह्यात सध्या करोनाग्रस्त मोठय़ा संख्यने घरीच उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात दि. २६ मार्च रोजी पहिला करोना रुग्ण मिळाला. त्यानंतर ३१ ऑगस्ट या १५९ दिवसांत जिल्ह्यात एकूण करोनाबाधित संख्या एक हजार २८७ एवढी होती. तर चाचणीसाठी घेतलेली नमुने संख्या १३ हजार ३५७ होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील १३ तारीखपर्यंत रुग्णसंख्या २ हजार ४२२ झाली आहे. तर करोना चाचणीसाठी घेण्यात आलेली नमुने संख्या २० हजार १०९ झाली आहे. याचाच अर्थ या १३ दिवसांत रुग्णसंख्या एक हजार ४२२ एवढी वाढली आहे. तर चाचणी संख्या ६ हजार ५५२ एवढी वाढली आहे. या १३ दिवसांत दिवसाला सरासरी ८७ ते ८८ रुग्ण मिळाले आहेत.

जिल्ह्यात सुरुवातीला करोना रुग्ण व संशयित यांच्यावर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, रुग्ण व संशयित संख्या वाढू लागल्यावर जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पिटल म्हणून जाहिर करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात १० कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात आली. तसेच कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आली. ही सेंटर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय येथे सुरु करण्यात आली. या ठिकाणी करोना उपचारासाठी बेड उभारण्यात आले. त्यानंतर त्या त्या तालुक्यातील रुग्णावर तेथील कोवीड सेंटर किंवा कोवीड हेल्थ सेंटर येथे उपचार सुरु करण्यात आले.

करोना उपचारासाठी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना ऑक्सीजन कमी पडत होता. कोल्हापुर जिल्ह्याने ऑक्सिजन देण्यास नकार दिल्याने सध्या गोवा राज्यातून ऑक्सीजन आणला जात आहे. जिल्ह्याचा स्वत:चा ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. करोना येण्यापूर्वी जिल्ह्यात ७ व्हेंटीलेटर होते. ती संख्या आता ५६ झाली आहे. मात्र, करोना रुग्ण उपचारासाठी उभारण्यात आलेली बेड संख्या जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्ण पाहता कमी पडत आहत. जिल्ह्यात ८४० बेड आहेत. तर सध्या उपचार घेणारे रुग्ण एक हजार २०२ आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच सध्या सलाईनवर आली आहे.जिल्ह्यात करोनासाठी २० आयसीयू बेड उभारण्यात आले आहेत. गरज पडली तर यात वाढ करण्यात येते. तसेच पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजला १०० बेड घेण्यात आलेले आहेत. परंतु त्याचा सध्या वापर करीत नाहीत. तो सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शाम पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील बेड व्यवस्था — जिल्हा रुग्णालय-२२५,वैभववाडी -१५०, वेंगुर्ले -१५०,कुडाळ- ९०, मालवण-  ४५, कणकवली- ४५,

सावंतवाडी -४५, देवगड -४५, दोडामार्ग ४५, एकूण ८४० आहेत.

कोवीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. यामध्ये मुख्यत:  फिजिशियन्स व अ‍ॅनेस्थेशिया स्पेशालिस्ट यांचा समावेश आहे.

तसेच गृह अलगिकरणातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी पथकांची म्हणजेच रॅपिडेक्शन टीमची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर व कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. हे पथक रुग्णांची घरी जाऊन नियमित तपासणी करणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे लवकरच शंभर खाटांची सुविधा उभारण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.  या क रोनाच्या काळात जिल्ह्यातील वाढत असणारा कोवीडचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आपल्या सेवा द्याव्यात व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात करोना बळींची संख्या दोनशेवर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या शनिवारी दोनशेवर पोचली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या १३ सप्टेंबरपासून शनिवारअखेरपर्यंत ११ जण करोनामुळे मृत्यू पावल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त दोनजण शनिवारी मरण पावले असून उरलेल्या नऊजणांचा गेल्या आठ दिवसांत मृत्यू झाला आहे. मात्र त्यांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा २०९ झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक, ६२  मृत्यू झाले असून त्या पाठोपाठ चिपळूण (४९), खेड (३५) आणि दापोली तालुक्यात (२५) करोनाबाधितांचा मृत्यू ओढवला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर ३.०१ टक्के वर पोचला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सापडलेल्या नवीन ६९ करोनाबाधित रुग्णांपैकीही सर्वाधिक ४२ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील असून त्या खालोखाल खेड  तालुक्यात १३ रूग्ण आढळून आले आहेत.

रायगडमध्येकरोनाचे ६१५ नवे रुग्ण

अलिबाग : रायगड जिल्ह्यात दिवसभरात करोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ६१५ नवे रुग्ण आढळून आले. उपचारानंतर  ७९० रुग्ण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ६ हजार ०७० करोनाचे अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत. तर १०८४ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ६१५ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यात पनवेल मनपा हद्दीत २१५, पनवेल ग्रामिण ७५, उरण ५, खालापूर ३०, कर्जत ३४, पेण ७८, अलिबाग ५६, मुरुड ३, माणगाव २४, तळा ७, रोहा २६, सुधागड २, श्रीवर्धन ४, म्हसळा ४, महाड ३४, पोलादपूर येथील १८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ७० करोनाचे रुग्ण आहेत.

यात पनवेल मनपा हद्दीतील २ हजार १३७,  पनवेल ग्रामिण ८०१, उरण १८२, खालापूर २६८, कर्जत २४१, पेण ४९४, अलिबाग ६५३, मुरुड ६९, माणगाव ३८१, तळा ४४, रोहा ४४१, सुधागड ५८, श्रीवर्धन ५५, म्हसळा ४३, महाड १६५, पोलादपूर येथील ३८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे, तर मृत्यूदर ३ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२.३ आहे. ४ हजार २९६ जणांवर गृहविलगिकरणात उपचार सुरु आहेत. २१४ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत असून तर २१ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 12:16 am

Web Title: 1119 people affected with coronavirus in sindhudurg district zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 महिलेवर अत्याचार करणाऱ्यास अटक
2 महाराष्ट्रात २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज, आत्तापर्यंत ८ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त
3 महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करोनाची बाधा
Just Now!
X