22 September 2020

News Flash

अकोला जिल्हय़ात महिनाभरात ११२९ रुग्ण

जिल्हय़ातील मृत्यूदर ३.९२ टक्के; ८०.६३ टक्के रुग्ण करोनामुक्त

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्हय़ात महिन्याभरामध्ये तब्बल ११२९ रुग्ण वाढले आहेत. जिल्हय़ात पहिला रुग्ण आढळून ७ ऑगस्टला चार महिने पूर्ण झाले. या चार महिन्यातील सर्वाधिक रुग्ण वाढ गत महिन्यात नोंदवल्या गेली आहे. जिल्हय़ातील मृत्यूदर ३.९२ टक्के, तर ८०.६३ टक्के करोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ातील रुग्ण वाढ व मृत्यूदर अद्यापही नियंत्रणात आलेला नाही.

अकोला जिल्हय़ात गत चार महिन्यांपासून करोना संसर्ग सातत्यपूर्ण चौफेर पसरत गेला. शहरातील बहुतांश परिसर व्यापून घेतल्यानंतर ग्रामीण भागातही करोनाने झपाटय़ाने वाढ झाली. अकोल्यात ७ एप्रिलला करोनाने शिरकाव केला, तर १३ एप्रिलला  शहरात पहिला बळी गेला. अगोदर परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात असताना मे, जून, जुलै महिन्यात रुग्ण व मृत्यू संख्या वेगाने वाढत गेली. २८ एप्रिलपासून सुरू झालेली रुग्ण वाढीची मालिका अद्यापही अखंडित आहे. त्यातच दुर्दैव म्हणजे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत गेले. महिन्याभरात तब्बल ११२९ रुग्णांची भर पडली. आतापर्यंतची एका महिन्यातील ही सर्वाधिक रुग्ण वाढ आहे.

जिल्हय़ातील एकूण आकडेवारीत अगोदर बाहेरच्या जिल्हय़ातील रुग्ण व मृत्यूची नोंद होती. जिल्हा प्रशासनाने ते वगळल्याचे २४ जुलैला जाहीर केले. आता केवळ अकोला जिल्हय़ातीलच एकूण रुग्ण २९०८ असून, ११४ करोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. मधल्या काही काळामध्ये शहरातील रुग्ण वाढ मंदावल्याचे चित्र होते. आता पुन्हा एकदा शहरातील रुग्ण वाढीने वेग घेतल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील रुग्ण वाढीचे सत्र कायम आहे. रुग्ण व मृत्यूदर वाढीमुळे जिल्हय़ात चिंताजनक परिस्थिती आहे.

एकाचा मृत्यू; १८ नवे रुग्ण

जिल्हय़ात आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. १८ नवे करोनाबाधित रुग्ण शुक्रवारी आढळून आले. जिल्ह्यातील एकूण १५३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १३५ अहवाल नकारात्मक आले. सध्या ४४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री एका ६१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. ते जठारपेठ येथील रहिवासी होते. त्यांना २८ जुलैला दाखल करण्यात आले होते. आजच्या सकारात्मकमध्ये महागाव चार जण, बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील प्रत्येकी दोन, तर सिव्हिल लाईन, जठारपेठ, जीएमसी वसतिगृह, रामनगर, माधवनगर, दत्त नगर, मूर्तिजापूर आणि कैलास टेकडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज एकूण ४१ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्हय़ातील २३४५ जण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:10 am

Web Title: 1129 patients in a month in akola district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पावसाचा जोर कमी झाल्याने सांगलीचा पुराचा धोका टळला
2 गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे धावणार
3 चंदगड तालुक्यात दोरखंडाचा वापर करून बचावकार्य, सुसज्ज यंत्रणेच्या दाव्यातील फोलपणा
Just Now!
X