News Flash

महाराष्ट्रात ११६५ नवे करोना रुग्ण, ४८ मृत्यू, संख्या २० हजार २०० च्या वर

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात ११६५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना रुग्णांची संख्या २० हजार २२८ इतकी झाली आहे. राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात ४८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झालेल्या करोना रुग्णांची संख्या ७७९ झाली आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर २७ महिला आहेत. आज झालेल्या ४८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती प्राप्त झालेली नाही. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 8:55 pm

Web Title: 1165 new covid19 cases 48 deaths reported in the state today the total number of positive cases in the state rises to 20228 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नाशिक जिल्ह्यात करोनाबाधित पोलिसाचा मृत्यू
2 सोलापुरात करोनाच्या २० नव्या रूग्णांची भर; महिलेचा मृत्यू
3 खंडेरायाच्या जेजुरीत आढळला करोनाचा पहिला रुग्ण
Just Now!
X