01 October 2020

News Flash

कारमध्ये गुदमरून मुलाचा मृत्यू

तो आपल्या आजी व मावशीसोबत प्लास्टिकचा कचरा वेचण्यासाठी आलेवाडी गावात आला होता.

संग्रहित छायाचित्र

अकोट तालुक्यातील आलेवाडी येथे बंद कारमध्ये गुदमरून एका १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  तानेश विष्णू बल्लाळ असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आजी व मावशीसोबत प्लास्टिकचा कचरा वेचण्यासाठी आलेवाडी गावात आला होता.

आलेवाडी येथे झाडा झुडपात एक कार गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत उभी होती. मंगळवारी तानेश खेळता खेळता या कारमध्ये जाऊन बसला. मात्र, याच सुमारास कारचे दरवाजे आतून बंद झाले आणि तानेश कारमध्येच अडकला. तानेशचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी तानेश दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर तानेश बंद कारमध्ये सापडला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दहिहंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 11:02 am

Web Title: 12 year old boy dies after getting trapped inside car in akot
Next Stories
1 अहमदनगरमध्ये प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू
2 रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास सुरुवात
3 सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस
Just Now!
X