News Flash

हजारेंना पाठिंब्यासाठी जेलभरो आंदोलनात १२५ जणांना अटक

पारनेर महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली.

पारनेर शहरातून काढण्यात आलेला मोर्चा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले.  (छाया : संदीप खेडेकर)

ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा  हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पारनेर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळी विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी शहरातून पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत जेलभरो आंदोलन केले त्यात १२५ आंदोलकांना अटक करण्यात आली. हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असल्याने आंदोलकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या, त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, पत्रकार संजय वाघमारे, शाहीर गायकवाड, पं.स. सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, राहुल शिंदे, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, शिवाजी व्यवहारे, डॉ. राजेश भनगडे, संजय मते, यांच्यासह पारनेर महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांनी मोर्चात सहभागी होऊन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

पारनेर महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. लाल चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून मोर्चा पोलीस ठाण्यात धडकल्यानंतर मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना सभापती राहुल झावरे म्हणाले, वयाच्या ८२ व्या वर्षी चार दिवस उपोषण केल्याने अण्णांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास  त्यास हे सरकार जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे यांनी यावेळी बोलताना राजकीय स्वार्थासाठी अण्णांचा वापर होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. अण्णांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने न पाहिल्यास व आंदोलन मागे घेण्याच्या हालचाली न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच आंदोलनास मदत करण्यासाठी शहरात भीक माँगो आंदोलन करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. गणेश कावरे यांनी सांगितले. सरकारवर दबाव आणण्यासाठी तरुणांनी व्हॉटस् अ‍ॅप,  फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती करण्याचे आवाहन पठारे व वाघमारे यांनी केले.

बंदमुळे प्रवाशांचे हाल

बंद पुकारण्यात आल्याने बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सरपंच परिषदेसाठी आलेल्या तालुक्यातील विविध गावांच्या सरपंचांनाही चहाशिवाय परतावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:10 am

Web Title: 125 people arrested in the jel bharo andolan
Next Stories
1 मतांसाठी कालिया, रयतूबंधू, भावांतर, कृषकबंधू ..
2 भूकंपाच्या धक्क्यांनी पालघरमध्ये थरकाप
3 मी काय गुन्हा केला हे सांगा? – एकनाथ खडसे
Just Now!
X