महाराष्ट्रात १२ हजार ६१४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ३२२ मृत्यूंची नोंद मागील २४ तासांमध्ये झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ६ हजार ८४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रातली करोना रुग्णांची संख्या ही आता ५ लाख ८४ हजार ७५४ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ८ हजार २८६ रुग्णांना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १९ हजार ७४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ५६ हजार ४०९ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १० लाख ४४ हजार ९७४ लोक हे होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ५२४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्रातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६९.८२ टक्के झाला आहे. तर राज्यातला मृत्यू दर हा ३.३८ टक्के इतका झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे.