29 September 2020

News Flash

राज्यात १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित, रुग्णसंख्या पाच लाखांपेक्षा जास्त

दिवसभरात २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ५ लाख ३ हजार ८४ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेले १ लाख ४७ हजार ४८ रुग्ण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७ हजार ३६७ जणांचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एनएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यात आज ११ हजार ८१ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, आजपर्यंत राज्यात तब्बल ३ लाख ३८ हजार २६२ जण करोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ६७.२६ टक्क्यांवर पोहचला आहे. तर मृत्यू दर ३.४५ टक्के इतका आहे. सध्या राज्यात तब्बल ९ लाख ८९ हजार ६१२ जण गृहविलगीकरणात (होमक्वारंटाइन) आहेत. तर, ३५ हजार ६२५ जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन)मध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 7:55 pm

Web Title: 12822 covid19 cases 275 deaths reported in maharashtra today msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 संतापजनक : वर्धा जिल्ह्यातील पुलगावलगत अल्पवयीन बालिकेवर बलात्कार
2 कृष्णा-पंचगंगेच्या महापुराचा धोका टळला; महाराष्ट्र व कर्नाटकातील मंत्र्यांचा दावा
3 बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने संताप
Just Now!
X