News Flash

रायगडातील वर्षांसहली जीवघेण्या ठरतायत

रायगड जिल्ह्यात वर्षां सहलीसाठी येण्याचा प्लान करताय,

गेल्या दोन महिन्यांत वर्षांसहलीसाठी आलेल्या १३ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दोन महिन्यांत १३ पर्यटकांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात वर्षां सहलीसाठी येण्याचा प्लान करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या दोन महिन्यांत वर्षांसहलीसाठी आलेल्या १३ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन पर्यटक अद्यापही बेपत्ता आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटतांना पर्यटकांनी स्वत:चे जीव धोक्यात येणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.  सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून खळाळत कोसळणारे धबधबे, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली आणि ओसंडून वाहणारी लहान-मोठी धरणे, त्याचबरोबर घाटमाथ्यावरून नागमोडी वळणे रस्ते वर्षांसहलीसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व रायगड जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळेच कर्जत, खालापूर, माणगाव, सुधागड, रोहा, महाड आणि पोलादपूर तालुके हे वर्षांसहलीसाठी पर्यटकांचे हॉट फेव्हरेट डेस्टिनेशन समजले जातात.

दरवर्षी मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांतून लाखो पर्यटक जिल्ह्यात वर्षांसहलीसाठी येत असतात. पण भौगोलिक परिस्थितीची जाणीव नसणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, मद्यप्राशन करून पाण्याच्या प्रवाहात उतरणे, आणि अतिउत्साहीपणा दाखवणे यामुळे ते आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. जिल्ह्यात १६ जून ते २७ जून या कालावधीत तब्बल १३ पर्यटकांचा वर्षांसहलीदरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेले दोन पर्यटक पडून गंभीर जखमी झाले आहेत. तर देवकुंड येथे पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकलेल्या ५५ पर्यटकांची बचाव पथकाने सुटका केली आहे.

पर्यटकांचे होणारे मृत्यू लक्षात घेऊन कर्जत, खालापूर आणि माणगाव तालुक्यातील धरणे आणि धबधब्यांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये असे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. पण प्रशासनाचे जमावबंदी आदेश झुगारून, आणि स्थानिक सूचना फलकांकडे दुर्लक्ष करून हजारो पर्यटक दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी दाखल होत आहेत. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वर्षांस्नानासाठी आपले जीव धोक्यात घालत आहेत.

पावसाचा जोर अचानक वाढल्यास धबधबे आणि धरणांमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतो, या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पर्यटक पाण्यात वाहून जातात. त्यामुळे वर्षांसहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी स्वत:चे जीव धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 

धबधबे आणि तलावात बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांचा तपशील

अनुक्रमांक तालुका धबधबा- तलावाचे ठिकाण मयत व्यक्तीचे नाव

१. कर्जत आनंदवाडी नेरळ सुरेश बंडप्पा चेंचकर

२. कर्जत  ओषाणे धबधबा किरण बोराडे

३. कर्जत  ओषाणे धबधबा तेजस बोराडे

४. कर्जत  बेडीस गाव राकेश वाळंज

५. कर्जत पेब किल्ला अब्दुल्ला

६. अलिबाग रामेश्वर तलाव मीत कळवणकर

८. माणगाव देवकुंड धबधबा विपिन पाठक

८. माणगाव देवकुंड धबधबा अखिलेश चौधरी

९. कर्जत सोलनपाडा धरण प्रवीण राणे

१०. कर्जत सोलनपाडा धरण दिलीप खंडागळे

११. कर्जत सोलनपाडा धरण सचिन कानडे

१२. कर्जत ओषाणे धबधबा रॉबिन मलकवडी

१३.    माणगाव  भिरा  सागर दुधे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 6:15 am

Web Title: 13 tourists death in two months in raigad district
Next Stories
1 दुर्गम भागातील एकही शाळा बंद होणार नाही- विनोद तावडे
2 कोकणातील सर्व ग्रामपंचायतीना लवकरच वाय-फाय सुविधा 
3 सुशीलकुमार शिंदे यांच्या पुनर्वसनामुळे सोलापूरमधील काँग्रेसला फायदा?
Just Now!
X