जिल्ह्यात रविवारी नवीन १३२ करोना बाधित रूग्ण आढळले असून त्यात चोपडा तालुक्यातील सर्वाधिक २७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता दोन हजार २८१ इतकी झाली आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पारोळा १३, जळगाव १८, भडगाव १८, चाळीसगाव सात, भुसावळ १०, रावेर आठ, अमळनेर दोन, एरंडोल चार, जळगाव ग्रामीण सात यांचा समावेश आहे. जळगाव शहराचे एकूण ४२२ रुग्ण झाले आहेत. चोपडा शहरात रविवारी करोनाबाधित रुग्ण सापडण्याचा उच्चांक गाठला गेला. ९० अहवालातील ६३ नकारात्मक, तर २७ सकारात्मक आले. त्यात तालुक्याच्या ग्रामीण भागातील ११ रूग्ण आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या आता दोनशे झाली आहे. तालुक्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये मामळदे दोन, चुंचाळे चार, मंगरूळ एक, अकुलखेडा चार, तसेच चोपडा शहरात पंकज नगर आणि फुलेनगर प्रत्येकी दोन, तेली वाडा तीन, प्रभात कॉलनी, मेन रोड, गुजर अळी, सुभाष चौक, शिव कॉलनी, मल्हापुरा, पटवे अळी, पाटील गढी, बोरोले नगर या भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळल्याची माहिती  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी दिली. तालक्यातील एकूण बाधितांपैकी ८७ रुग्ण बरे झाले आहेत.