27 May 2020

News Flash

सांगलीत १३४ जणांची चाचणी नकारात्मक

सद्य:स्थितीत जिल्ह्यत असणाऱ्या २२ करोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

संग्रहित छायाचित्र

सांगली जिल्ह्यत परदेशवारी करून आलेले, संशयित आणि करोना रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या अशा १६२ व्यक्ती विलगीकरण कक्षामध्ये असून यापैकी १३४ जणांच्या स्वॅब नमुने नकारात्मक आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. सध्या २२ रुग्ण करोनाबाधित असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

जिल्ह्य़ात परदेशातून आलेले संशयित, त्यांच्या संपर्कात आलेले अशा आतापर्यंत १४९८ व्यक्ती आहेत. यापैकी १६२ व्यक्ती विलगीकरण कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची करोना विषाणूच्या संसर्गाबाबत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १३४ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत २२ जण करोनाबाधित असून मिरज येथे करोना रुग्णालयाच्या कक्षात उपचार घेत आहेत. १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या ५ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ चे अहवाल निगेटिव्ह आहेत तर १ अहवाल प्रलंबित आहे. सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या एकूण १९ अहवालापैकी १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २ अहवाल प्रलंबित आहेत.

सद्य:स्थितीत जिल्ह्यत असणाऱ्या २२ करोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  इन्स्टिटय़ुशनल क्वोरंटाइनमध्ये ६४ व्यक्ती (मिरज येथे ३४ व इस्लामपूर येथे २६) असून होम क्वोरंटाइन असलेल्या १२७२ व्यक्तींपैकी ५०० व्यक्तींचा १४ दिवसांचा होम क्वोरंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्य:स्थितीत ७७२ व्यक्ती होम क्वोरंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 12:12 am

Web Title: 134 people tested negative in sangli abn 97
Next Stories
1 टाळेबंदीत पोलीसांच्या गाडीतच ओली पार्टी; पोलिसासह तिघावर गुन्हा
2 निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु
3 जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; अभियंत्याला बेदम मारहाण
Just Now!
X