News Flash

लातूर – शालेय पोषण आहारातून १४० विद्यार्थ्यांना विषबाधा

पोषण आहारानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला

नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या सात लहान मुलांना एका अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच म़त्यू झाला तर उर्वरित मुले जखमी आहेत.

लातूरमध्ये शालेय पोषण आहारातून १४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. जळकोट तालुक्यातील मंगरुळ गावात ही घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या पोषण आहारानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. दुपारी विद्यार्थ्यांना भात आणि वरण देण्यात आलं होतं. यानंतरच त्यांना त्रास सुरु झाला. विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. सात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 6:39 pm

Web Title: 140 students food poisioning in latur
Next Stories
1 भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण – आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
2 अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
3 विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्राचा रंगही शाळा ठरवणार, पुण्याच्या शाळेत अजब अटी; पालक संतप्त
Just Now!
X