महाराष्ट्रात १४ हजार १६१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात ३३९ मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान मागील २४ तासात ११ हजार ७४९ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४ लाख ७० हजार ८७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत करोनामुळे २१ हजार ६९८ रुग्णांचा महाराष्ट्रात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही मााहिती दिली आहे.

आत्तापर्यंत देण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार १३२ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अनलॉकची प्रक्रियाही सुरु झाली आहे. बाहेर पडताना सर्वतोपरी काळजी घ्या, गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर बाहेर जाताना मास्कचा वापर करा आणि हँड सॅनेटायझर वापरा आणि घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ साबणाने धुवा असंही आवाहन वारंवार करण्यात येतं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.