रायगडकरांची जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल १४२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २ हजार ७४६ वर पोहोचली आहे. दिवसभरात १०३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर बुधवारी उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात १४२ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ९५, पनवेल ग्रामिणमधील २७, उरणमधील १०, खालापूर ४, पेण १, मुरुड १, रोहा ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील २ तर पनवेल ग्रामिणमधील  एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १०३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ७१९५ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ४४०१ जणांचे अहवाल नकारात्मक आले. २७४६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ४८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १८३९ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ७९४ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ४१०, पनवेल ग्रामिण हद्दीतील १५८, उरणमधील ३६,  खालापूर ११, कर्जत ३८, पेण ३७, अलिबाग ४१,  मुरुड २, माणगाव १२, तळा येथील ०, रोहा २६, सुधागड ०, श्रीवर्धन ०, म्हसळा ०, महाड १५, पोलादपूरमधील ८ करोनाबाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ६० हजार ९२९ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.