देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात १४ हजार ४९२ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ हजार २४३ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील ६ लाख ४३ हजार २८९ करोनाबाधितांमध्ये करोनावर मात केलेले ४ लाख ५९ हजार १२४ जण, सध्या उपचार सुरू असलेले (अॅक्टिव्ह केसेस) १ लाख ६२ हजार ४९१ रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २१ हजार ३५९ जणांचा समावेश आहे.

आज पर्यंत प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या ३४ लाख १४ हजार ८०९ तपासण्यां पैकी आजपर्यंत ६ लाख ४३ हजार २८९ (१८.८४ टक्के)तपासण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

राज्यात सद्यस्थितीस ११ लाख ७६ हजार २६१ जण गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) आहेत. तर, ३७ हजार ६३९ जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन)  मध्ये आहेत.