19 September 2020

News Flash

दुष्काळग्रस्तांसाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता वितरित

जिल्हाधिकाऱ्यांना मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी विशेष लक्ष देण्याचा आदेश देण्यात आला आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

दुष्काळग्रस्तांसाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईसाठी हा हप्ता वितरित करण्यात आला. मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा मदतनिधी तातडीने जमा करण्याचा आदेश दिला आहे. मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त भागांसाठी मदत जाहीर करण्यात आली असून मदतनिधी वाटप सुरु करण्यात आला आहे. यासाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. हा निधी विभागीय आयुक्तांच्या मार्फेत जिल्हाधिकारी आणि तेथून संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना वर्ग केला जाणार आहे. यानंतर हा निधी दुष्काळग्रस्त भागातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली जात असून काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. मुख्य सचिवांनी यादया लवकरात लवकर तयार करुन निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 9:07 pm

Web Title: 1450 crore first installment for drought hit farmers
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी, अण्णा हजारेंचे उपोषण अखेर मागे
2 ‘नाणार’विरोधात शिवसेना आक्रमक, समितीचं कामकाज बंद पाडलं
3 Maharashtra Budget 2019 : २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प
Just Now!
X