अलिबाग : रायगड जिल्ह्यत रस्ते अपघातात गेल्या पाच वषार्ंत १४९९ जणांचा मृत्यू झाला. अपघातांचे तर या वर्षी चार महिन्यांत ३५० अपघातांची नोंद झाली असून ९० जणांचां बळी गेला आहे. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, वाढलेली अवजड वाहतुक, आणि बेदरकार वाहन चालक ही या अपघातांमागची प्रमुख कारणे ठरली आहेत.

रायगड जिल्ह्यातून मुंबई- गोवा महामार्ग, मुंबई- पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबइर्- पुणे महामार्ग असे तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यातील मुंबई- गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर अपघातात आजवर हजारो लोकांनी जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभिररीत्या जखमी झाले आहेत.

आकडेवारीचा विचार केला तर २०१३ मध्ये जिल्ह्यत १ हजार २७९ अपघातांची नोंद झाली. यात २८८ जणांचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये १ हजार २६२ अपघात झाले. यात २५५ जणांचा बळी गेला. २०१५ मध्ये १ हजार ४२३ अपघातांची नोंद झाली, ज्यात ३५७ जण मृत्यूमुखी पडले. २०१६ मध्ये झालेल्या १ हजार १५१ अपघातात ३०१ जणांचा मृत्यू झाला, तर २०१७ मध्ये १ हजार १० अपघातात २२४ जण मृत्यूमुखी पडले, म्हणजेच गेल्या पाच वषार्ंत जिल्ह्यात रस्ते अपघातात १ हजार ४९९ जणांचा बळी गेला. ही एक चिंतेची बाब आहे.

जिल्ह्यतील अपघातांची आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या दोन वर्षांंत रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने घटत आहे. त्यामुळे अपघातात दगावणाऱ्या आणि जखमी होणाऱ्यांची संख्याही घटण्यास सुरूवात झाली आहे. ही  एक सकारात्मक बाब आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता सुरु झाले आहे. वर्षभरात हे काम पुर्णत्वाकडे गेले तर अपघातांचे प्रमाण आणखी कमी होईल असा अंदाज रायगड पोलीसांनकडून व्यक्त केला जातो आहे.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी दोन पातळ्यांवर आम्ही काम केले. एकीकडे बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई सूर ठेवली. तर दुसरीकडे वाहनचालकांमध्ये वाहतून नियमनाबाबत जनजागृती केली. यामुळे गेल्या दोन वषार्ंत रस्ते अपघातांच प्रमाण कमी झाले आहे अस मत वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी व्यक्त केले.

बहुतांश अपघातांना हा वाहन चालकांचा बेजबाबदारपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष कारणीभुत ठरले आहे. जिल्ह्यत सातत्याने वाढलेली अवजड वाहतुक आणि रस्त्यांची दुरवस्थाही काही प्रमाणात अपघातांना कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे बेदरकारवाहन चालकांविरोधात सातत्याने कारवाई सुरु ठेवली जात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.