नाशिकमधील येवल्याजवळ एसटी बस उलटल्याने झालेल्या अपघातात १५ महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. तर या अपघातात एक मुलगी बेशुद्ध पडली आहे. महालखेडा गावातून येवल्याला जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला. या बसमध्ये ५० विद्यार्थी होते.

एका वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाच्या दिशेला उलटली. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर येवल्याच्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.