दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षाच्या मुलीने एका दिवसात सायकलवर तब्बल २५० किमीचा प्रवास करत पंढरपूरची वारी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या प्रज्ञा सावंत या मुलीने एका दिवसात सायकलवर वारी केली आहे. पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर असा २५० किलोमीटर प्रवास सायकलवर करत तिने आधुनिक वारी केलीय. या कामगिरिमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रज्ञा सावंतने या आधुनिक वारीच्या माध्यमातून फिटनेसचा संदेश दिला आहे. सध्याची तरुणाई सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे. त्यामुळं त्यांच फिटनेसकडे त्यांचे लक्ष नाही. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी जनजागृती करणं गरजेचं होतं, असं प्रज्ञा सावंत म्हणाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2019 1:07 pm