रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.  दिवसभरात ३५८ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. ३६५ जण करोनातून पुर्ण बरे झाले तर बारा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १८ हजार ९२२ वर पोहोचली आहे. यापैकी १५ हजार ४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ३५८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १६९, पनवेल ग्रामिण मधील २८, उरणमधील १८, खालापूर २१, कर्जत ५, पेण १३, अलिबाग १४, मरुड २, माणगाव ३, तळा २, रोहा ५२, सुधागड ४, म्हसळा ३, महाड १९, पोलादपूर ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ३, पनवेल ग्रामिण २, उरण ३, खालापूर १, पेण ४, अलिबाग १, रोहा १, जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३६५ जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ६२ हजार ८४७ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३६० रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ५६७, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३५८, उरणमधील १३२, खालापूर २२०, कर्जत ७२, पेण २४२, अलिबाग २१४, मुरुड २६, माणगाव ७८, तळा येथील १०, रोहा २६७, सुधागड २६, श्रीवर्धन १४, म्हसळा १४, महाड १०९, पोलादपूरमधील ११ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७९ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

कोव्हीड केअर सेंटर मध्ये ४७९, डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर मध्ये ६०७, डेडिकेटेड कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये २९० तर गृह विलगीकरणात २ हजार २३४ लोकांवर उपचार सुरु आहेत.