जालना शहराजवळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा ‘ड्रायपोर्ट’ आणि इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी १५१ हेक्टर जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जालना तालुक्यातील दरेगाव व बदनापूर तालुक्यातील जवसगाव शिवारातील ही जमीन आहे.
दरेगाव शिवारातील १०८ हेक्टर, तर जवसगाव ४३ हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे जमिनीचे हस्तांतरण करण्याचा निर्णय जाहीर करताना जवसगाव शिवारातील २० हेक्टरवर नियमानुकूल करण्यात आलेल्या अतिक्रमणांचाही उल्लेख केला. ज्यांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली, त्यांना त्याच भागात पर्यायी जमिनी देता येतील काय, याची पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्याची सूचना राज्य सरकारने केली.
अतिक्रमणे नियमानुकूल झालेल्या जमिनीचा मोबदला संबंधितांशी वाटाघाटी करून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने निश्चित करावा आणि तो विभागीय आयुक्तांकडे जमा करूनच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही सरकारने दिले. ड्रायपोर्टची उभारणी झाल्यानंतर मराठवाडा, विदर्भातील उद्योजक, शेतकऱ्यांना आपला माल व उत्पादन येथूनच मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे पाठविणे शक्य होणार आहे.
ड्रायपोर्ट परिसरात इंडस्ट्रीयल पार्क उभारण्याचाही प्रस्ताव आहे. शेतकरी आपल्या उत्पादित मालावर इंडस्ट्रीयल पार्कमध्ये प्रक्रिया करू शकतील किंवा तेथील शीतगृहात त्यांना मालाची साठवण करता येईल, असाही प्रस्ताव आहे. खासदार रावसाहेब दानवे ड्रायपोर्ट याबाबत पाठपुरावा करीत आहेत.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
car charging point
वसई विरार शहरात चार्जिंग केंद्र उभारणार
Pune, Metro Line, Extensions, PMRDA, Mahametro, Clash, Project Responsibility,
पुण्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे गाडे अडले; काम कोण करणार यावरून तिढा