देशभरासह राज्यभरात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या आता ३४ लाखांपेक्षाही पुढे गेली आहे. तर, राज्यातील करोनाबाधितांची संख्या सात लाखांच्याही पुढे पोहचली आहे. राज्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे जमल्या जाणाऱ्या पोलिसांनाही करोनाचा अधिकच संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. केवळ संसर्गचा नाहीतर करोनामुळे पोलिसांचा मृत्यू देखील होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात आणखी १५१ पोलीस करोनाबाधित आढळले असून, पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १४ हजार ७९२ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ७७२ जण, करोनामुक्त झालेले ११ हजार ८६७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १५३ जणांचा समावेश आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १४ हजार ७९२ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५७४ अधिकारी व १३ हजार २१८ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ७७२ पोलिसांमध्ये ३५८ अधिकारी व २ हजार ४१४ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या ११ हजार ८६७ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार २०१ व १० हजार ६६६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १५३ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १३८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.