28 October 2020

News Flash

16 लाख मजुरांना त्यांच्या राज्यात सोडलं : उद्धव ठाकरे

एसटी बसेसद्वारे सव्वा पाच लाख मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडलं, असल्याचंही सांगितलं

आतापर्यंत साधरण 16 लाख परप्रांतियांना आपण रेल्वे व बसद्वारे त्यांच्या राज्यात सोडलं असल्याचे माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. विशेष म्हणजे याबद्दल माहिती देतांना त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचे देखील आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपण साधारणपणे 16 लाख परप्रांतियांना त्यांच्या राज्यात सोडलं आहे. मी पियूष गोयल यांना धन्यवाद देतो. कारण गेल्यावेळी याबद्दल बोललो तर त्यांना राग आला होता. मात्र तुम्ही मनावर घेतलं आणि खरोखर तुम्ही ट्रेन उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे साधारण साडेअकरा लाखांच्यावरती मजुरांना आपण त्यांच्या राज्यात जाऊ दिलं. तसेच, साडेबेचाळीस हजार एसटी बसेसद्वारे आपण सव्वा पाच लाख मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडलं. यावर आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जळपास 85 ते 90 कोटी रुपये खर्च केले. तसेच, साधारण 22 पेक्षा जास्त विमानांद्वारे तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आपण महाराष्ट्रात आणलेलं आहे. सात जून पर्यंत आणखी काही विमानं येत असल्याचेही ते म्हणाले.

याशिवाय, शिवभोजन थाळीचे आजपर्यंत 838 केंद्र राज्यात कार्यरत केलेली आहेत. 1 ते 30 मे या कालवधीत शिवभोजन थाळीच्या योजनेतून 32 लाख 77 हजार 778 शिवभोजन थाळ्यांद्वारे आपण भोजन देण्याची व्यवस्था केली असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 9:27 pm

Web Title: 16 lakh workers released to their state uddhav thackeray msr 87
Next Stories
1 विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सेमिस्टरच्या आधारावर पास करणार – उद्धव ठाकरे
2 ‘पुनःश्च हरिओम’चा उद्धव ठाकरेंनी दिला नारा
3 वर्धा : बल्लरशाहकडे  निघालेल्या मालगाडीचे डब्बे घसरले
Just Now!
X