News Flash

महाराष्ट्रात ३८७४ नवे करोना रुग्ण, १६० रुग्णांचा मृ्त्यू

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची माहिती

संग्रहित

महाराष्ट्रात ३८७४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला २४ तासात ५८ हजार ५४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार २०५ झाली आहे. राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४ टक्के इतकं आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ४.६७ टक्के आहे. राज्यात सध्या ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या ५ हजार ९८४ झाली आहे. मुंबईत १३६, जळगावात १०, पुण्यात ५, सोलापुरात १, औरंगाबादमध्ये ६, जालन्यात १ तर बीडमध्ये १ मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात ३८७४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख २८ हजार २०५ झाली आहे. राज्यात सध्याच्या घडीला ६४ हजार १५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्याच्या घडीला ५८ हजार ५४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 11:05 pm

Web Title: 160 deaths and highest single day rise of 3874 new covid19 cases reported in maharashtra today the total number of positive cases in the state is now 128205 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! मद्यमुक्त चंद्रपूरमध्ये पाच वर्षात शंभर कोटींपेक्षा अधिक किंमतीची अवैध दारू जप्त
2 रायगड : करोनाचे १२८ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा २,२९६ वर
3 गणेश मूर्तींच्या उंचीबाबत दोन दिवसात निर्णय घेणार: मुख्यमंत्री
Just Now!
X