राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजच्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा – १२३७ (३०), ठाणे- २३४ (९), ठाणे मनपा-२२८ (३), नवी मुंबई मनपा-४८८ (१), कल्याण डोंबिवली मनपा-३६६ (१४), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-१२, मीरा भाईंदर मनपा-१२० (१), पालघर-१५८ (८), वसई-विरार मनपा-१३१ (६), रायगड-३२२ (३),पनवेल मनपा-२३९ (२), नाशिक-३२५ (५), नाशिक मनपा-१०४९, मालेगाव मनपा-६३ (१), अहमदनगर-२८३ (७),अहमदनगर मनपा-१८७ (२), धुळे-८९ (२), धुळे मनपा-६९ (१), जळगाव- ६२५ (१०), जळगाव मनपा-१३०, नंदूरबार-२९ (५), पुणे- ९९१ (१२), पुणे मनपा-१६६३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-१०७२ (२), सोलापूर-३४५ (६), सोलापूर मनपा-४८, सातारा-६१६ (५), कोल्हापूर-६६९ (१६), कोल्हापूर मनपा-३०५ (१२), सांगली-३९३ (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-२९७ (१२), सिंधुदूर्ग-४८, रत्नागिरी-१६३ (५), औरंगाबाद-६३ (२),औरंगाबाद मनपा-५८ (४), जालना-६७, हिंगोली-१०, परभणी-४२, परभणी मनपा-२५ (४), लातूर-१५४ (३), लातूर मनपा-११५ (३), उस्मानाबाद-१०८ (२),बीड-१०४ (३), नांदेड-१८३ (४), नांदेड मनपा-१२८ (१), अकोला-२९ (२), अकोला मनपा-५२ (१), अमरावती-२८ (३), अमरावती मनपा-८६ (३) , यवतमाळ-९५ (१), बुलढाणा-४४, वाशिम-६३ , नागपूर-२२३ (५), नागपूर मनपा-८३६ (४०), वर्धा-६६, भंडारा-१०९, गोंदिया-४८, चंद्रपूर-११२, चंद्रपूर मनपा-१६४, गडचिरोली-७५, इतर राज्य १७ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.