News Flash

राज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू

आतापर्यंत राज्यात २४१ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी १६९ पोलीस करोनाबाधित आढळले असून, दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २२ हजार ६२९ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले (अॅक्टिव्ह केस) ३ हजार १९० जण, बरे झालेले १९ हजार १९८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २४१ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील एकूण २२ हजार ६२९ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ४७३ अधिकारी व २० हजार १५६ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार १९० पोलिसांमध्ये ३९७ अधिकारी व २ हजार ७९३ कर्मचारी आहेत.

करोनातून बरे झालेल्या १९ हजार १९८ पोलिसांमध्ये अधिकारी २ हजार ५२ व १७ हजार १४६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २४१ पोलिसांमध्ये २४ अधिकारी व २१७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 4:16 pm

Web Title: 169 police personnel tested positive for covid19 and 2 died in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …ही शिवसनेची मजबुरी आहे का?; भाजपा नेत्याचा संजय राऊत यांना सवाल
2 अमरावती : अंघोळीसाठी गेलेली तीन मुलं बुडाली, वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही अंत
3 सर्वसामान्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, तर १५ मंत्र्यांना दिली नाहीत वीजबिलं
Just Now!
X