19 January 2021

News Flash

मावशीच्या नवऱ्याचं लाजिरवाणं कृत्य; लॉकडाउनच्या काळात अल्पवयीन भाचीवर केला वारंवार बलात्कार

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केला अनेकदा केला अत्याचार

(संग्रहित छायाचित्र)

लॉकडाउनच्या काळात परळ येथील आपल्या मावशीच्या घरी अडकून पडलेल्या एका १७ वर्षीय तरुणीला एका भीषण प्रकाराला समोरं जावं लागलं आहे. या काळात मावशीच्या नवऱ्याने दोन महिने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, धुळे येथील रहिवाशी असलेली पीडित तरुणी लॉकडाउनच्या काळात मुंबईतील परळ येथील आपल्या मावशीच्या घरी आली होती. याचा गैरफायदा घेत तिच्या मावशीच्या नवऱ्याने अर्थात काकाने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. जेव्हा जेव्हा घरातील लोक बाहेर जात होते तेव्हा तो आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार करत होता. ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या काळात अनेकदा या आरोपीने आपल्या भाचीसोबत हे अमानुष कृत्य केलं. तसेच पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर याचं आपण व्हिडिओ चित्रीकरण केलं असून कुणाला याबाबत सांगितल्यास व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करुन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर अनेकदा अत्यार केला, असं पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे.

दरम्यान, पीडित मुलगी नुकतीच धुळ्याला आपल्या घरी परतली यावेळी आपल्या पोटात दुखत असल्याचे तिने पालकांना सांगितले. त्यानंतर तिला तपासणीसाठी दवाखान्यात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेत याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने सर्व प्रकार कथन केला.

ज्या रुग्णालयात या मुलीची तपासणी झाली त्या रुग्णालयाने याबाबत धुळे पोलिसांना माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी काकाविरोधात झिरो एफआयआर दाखल करत ती भोईवाडा पोलिसांकडे बदली केली. कारण गुन्हा त्यांच्या हद्दीत घडला होता. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी बलात्कारप्रकरणी कलम ३७६ आणि बाल अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला. याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 10:11 am

Web Title: 17 year old girl allegedly raped by her uncle case registered under the pocso act at mumbais bhoiwada police station aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 संजय राऊतांना उच्च न्यायालयानं फटकारले; कंगनालाही दिली समज
2 “तपास यंत्रणांचे बळ वापरून महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे”
3 सामाजिक दायित्वासाठी समन्वय
Just Now!
X