रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 170 नवीन करोना रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी एका दिवसातील रुग्ण संख्येची वाढ आहे.

याचबरोबर एकूण रूग्णांची संख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला असून,  3 हजार 076 वर करोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. याशिवाय आज  दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाल्याने, आतापर्यंत मृत्यू झालेली संख्या पोहचली 120 वर पोहचली आहे.

आजतागायात बरे झालेल्यांची संख्या 1 हजार 953 झाली असून, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची सख्यां पहिल्यादांच हजाराच्या वर 1003 पोहचली आहे. आज पनवेल शहर -87 , पनवेल ग्रामीण -29, उरण- 6, खालापूर-8, कर्जत-3, पेण-16, अलिबाग-6, मुरुड-3, रोहा-60 व श्रीवर्धन- 6 असे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 5  हजार 24 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. तसंच जे 175 मृत्यू गेल्या चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत त्यातले 91 मृत्यू गेल्या 48 तासांमधले आहेत. तर 84 मृत्यू मागचे आहेत. सध्याच्या घडीला 65  हजार 829 केसेस पॉझिटिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.