उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी दिवसभरात 175 नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे तब्बल 15 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकुण करोनाबाधितांची संख्या 3 हजार 650 वर पोहचली असून, 2 हजार 98 जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे. 1 हजार 451 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून आजवरच्या मृतांची संख्या 101 वर पोहचली आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे 284 स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. यामधील 115 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीत 60 बाधित आढळलेले आहेत.

स्वॅब आणि रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीत सोमवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये उस्मानाबाद तालुक्यात 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर भूम तालुक्यात सर्वाधिक 51, उमरगा 27, तुळजापूर 21, कळंब 20, परंडा 14, लोहारा तालुक्यात 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

स्वॅब चाचणीत उस्मानाबाद शहरातील हनुमान नगर 2, काकडे प्लॉट 2, राम नगर 4, ख्वाजानगर, रामनगर, जोशी गल्ली, तांबरी विभाग, गणेशनगर, समतानगर येथे प्रत्येकी 1 तर तालुक्यातील रुईभर येथे 2, वाणेवाडी, येडशी, अंबेजवळगा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
तुळजापूर शहरातील दत्तनगर 2, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 1 तर तालुक्यातील अणदूर 5, नळदुर्ग 4, आपसिंगा, चिकुंद्रा, जळकोट, काटी येथे एक रुग्ण आढळून आला.उमरगा शहरातील आरोग्यनगर 3, भीमनगर 3, अजयनगर, जुनीपेठ येथे प्रत्येकी 1, तालुक्यातील सुपतगावात 8, दगडधानोरा 3, गुगळगाव, व्हंताळ येथे 1 रुग्ण आढळून आला. बसवकल्याण येथील 54 वर्षीय महिलेचा अहवालही उमरगा येथील रुग्णालयात तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.  कळंब शहरातील गांधीनगर 4, सोनारगल्ली 3, बाबानगर 1, तर तालुक्यातील डिकसळ येथे आणखी 7, पिंपळगाव डोळा येथे 3 तर येरमाळा येथे आणखी 1 रुग्ण आढळून आला आहे. परंडा शहरातील शिक्षक कॉलनीत 2, तालुक्यातील डोंजा व शेलगाव येथे प्रत्येकी 3, तर पिस्तमवाडीत 1 रुग्ण आढळला आहे. लोहारा शहरात 1 तर तालुक्यातील सास्तूर, जेवळी, मार्डी येथेही रुग्ण आढळले आहेत. भूम शहरातील नागोबा चौकात 6, शिवाजीनगर 5, विजयनगर 3, कसबा 2, समर्थनगर, दत्तनगर प्रत्येकी 1, तालुक्यातील आरसोलीत 2, हाडोंग्री 2 तर वालवडमध्ये 1 रुग्ण आढळला.

रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीत उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे एकाचवेळी 15 नवे रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हा रुग्णालयात 1, पाटोदा येथे 1, तात्पुरत्या कारागृहात 1 तर सातेफळ येथील एका तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तुळजापूर शहरातील साळुंके गल्लीतील 2 वृद्ध महिला पुरुषाचा, तर ढेकरी येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  उमरगा शहरातील गायकवाड एजन्सीमधील 1, आवटी प्लॉट 1, तर तालुक्यातील मुरुम येथील यशवंनगर आणि संभाजीनगर येथेही कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

परंडा शहरातील मंगळवारपेठ, कुर्‍हाड गल्ली, नृसिंह नगर, करमाळा रोड, मंडई पेठेत नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. लोहारा पोलीस ठाण्यातही 1 आणि शहरात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.  भूम शहरातील गांधी चौक येथील 8, समर्थनगरमधील 2, मेनरोड 2, शाळू गल्ली 2, शिवाजीनगर 2, लक्ष्मीनगर 2 आणि बागवान गल्ली, कुसुमनगर, झगडे गल्ली, ओंकार चौक, हंकारे गल्ली, कपिला डेअरी, रामहरी नगर, गालीबनगर, नगर परिषद कार्यालय आणि शहरातील अन्य एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथील 60 वर्षीय वृद्धाचा सोलापूर येथे उपचारादरम्यान तर इटकळ येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. परंडा तालुक्यातील जवळा येथील 67 वर्षीय वृद्धाचाही बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.