News Flash

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी 18 कंपन्यांच्या निविदा पात्र

बांधकाम प्रक्रियेसाठी एकंदर 18 कंपन्या पात्र ठरल्या आहेत

नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या 700 किमी लांबीच्या द्रुतगती मार्गाच्या 13 पॅकेजेसच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या अर्हताप्राप्त कंत्राटदारांच्या वित्तीय निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे आज खुल्या करण्यात आल्या. बांधकाम प्रक्रियेसाठी एकंदर 18 कंपन्या पात्र ठरल्या आहेत. नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या 700 किमी लांबीच्या द्रुतगती मार्गाच्या 13 पॅकेजेसच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या अर्हताप्राप्त कंत्राटदारांच्या वित्तीय निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे आज खुल्या करण्यात आल्या. बांधकाम प्रक्रियेसाठी एकंदर 18 कंपन्या पात्र ठरल्या आहेत.

46 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणार आहे. कृषी, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांना चालना देऊन त्यायोगे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळही या महामार्गामुळे निम्म्यावर येणार आहे.

आंतरराष्ट्रीय रस्ता परिषदेच्या (आयआरसी) नियमांनुसार या महामार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी 16 पॅकेजेसमध्ये या प्रस्तावित द्रुतगती महामार्गाचे विभाजन करण्यात आले आहे. त्यातील 13 पॅकेजेससाठी अर्हताप्राप्त कंत्राटदारांकडून वित्तीय निविदा मागविण्यात आल्या होत्या. उर्वरित तीन पॅकेजेससाठीही वित्तीय निविदांचे काम प्रगतिपथावर आहे.

दरम्यान, नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान खालील 18 कंपन्या पात्र ठरल्या.

1. मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रा लि.

2. एनसीसी लि.

3. टीपीएल सेंगिझ जेव्ही

4. एल अँड टी लि.

5. सद्भाव इंजिनीअरिंग लि.

6. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर

7. पीएनसी इन्फ्राटेक लि.

8. अॅफकाँन इन्फ्रास्ट्रक्चर लि.

9. बीएससीपीएल जीव्हीपीआर जे/व्ही

10. नवयुग इंजिनीअरिंग कं. लि.

11. अॅप्को इन्फ्राटेक प्रा. लि.

12. आयएलएफएस ट्रान्सपायरेशन नेटवर्क लि.

13. केएनआर कन्स्ट्रक्शन्स लि.

14. दिलीप बिल्डकाँन लि.

15. माँटेकार्लो लि., आयर्न टिंगल लि.

16. अशोका बिल्डकाँन लि.

17. गायत्री प्रोजेक्ट्स लि.

18. ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग प्रा. लि.

वित्तीय निविदा प्रक्रियेच्या या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राधेश्याम मोपलवार म्हणाले, ‘’वित्तीय निविदा खुल्या करण्याच्या या प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्याच्या ऐतिहासिक क्षणाच्या दिशेने आमचे एक दमदार पाऊल पडले आहे. कार्यारंभ आदेश जारी करण्यापूर्वी लवकरच आम्ही अर्हताप्राप्त निविदांची काटेकोर छाननी करणार आहोत. येत्या दोन आठवड्यांत महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे’’.

सद्यःस्थितीत शासनाने द्रुतगती महामार्गासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी 80.25 टक्के जमीन खरेदी केली आहे. तसेच एकंदर 4 हजार 788 कोटी रुपये भरपाईच्या स्वरुपात लाभार्थी शेतक-यांना वितरित करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 5:07 pm

Web Title: 18 companies finalised for nagpur samruddhi national highway
Next Stories
1 सहाय्यक पोलीस आयुक्तांना नडला ‘मुंबई फिव्हर’
2 एकीशी प्रेम, दुसरीशी विवाह करणारा थेट कोठडीत
3 इंधन दरवाढीचा फटका, ऑटो प्रवास महागला..
Just Now!
X