26 October 2020

News Flash

उघडय़ा गटारात पडून चिमुकलीचा मृत्यू

महापालिकेच्या हलगर्जीचा बळी

महापालिकेच्या हलगर्जीचा बळी

विरार : नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग परिसरात एका दीडवर्षीय चिमुरडीचा उघडय़ा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वीटी वीरेंद्र पाल असे तिचे नाव असून घरातून खेळायला बाहेर पडल्यावर ही दुर्घटना घडली आहे.

तिच्या परिवाराने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास ती घराबाहेर खेळण्यासाठी आली होती. काही वेळाने ती दिसेनाशी झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी व स्थानिकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुठेच आढळून आली नाही नाही. दरम्यान, परिसरातील उघडय़ा गटारात तिचा मृतदेह सापडला. गेल्या वर्षीसुद्धा याच परिसरात चारवर्षीय लहान मुलाचा अशाच प्रकारे उघडय़ा गटारात पडून मृत्यू झाला होता. अद्यापि महापालिकेच्या वतीने उघडय़ा गटारांवर झाकणे लावली गेली नाहीत, अथवा त्यांची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

नालासोपारा पूर्व धानीव बाग, गणेशनगर या ठिकाणी राहणारे संतोष यादव यांनी माहिती दिली. या परिसरात बैठय़ा चाळी आहेत आणि अनेक ठिकाणी गटारे आहेत. या गटारांच्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. मागील काही वर्षांपासून ही उघडी गटारे परिसरातील लहान मुलांच्या मृत्यूचे कारण बनत आहेत. या संदर्भात स्थानिक नगरसेवक आणि महापालिका यांना वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:14 am

Web Title: 18 month old baby dies after falling in open gutter in nalasopara zws 70
Next Stories
1 नियोजनामुळेच सांगलीला पुराचा फटका नाही
2 अमरावती विभागात ४४ टक्केच पीक कर्जवाटप
3 नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीकडे नेतृत्वाचा अभाव
Just Now!
X