सामाजिक बांधीलकी व मैत्रीचा अनोखा अनुभव आज कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नागरिकांना आला. रविवार  ऐन दुपारची वेळ होती. कडक उन्हामुळे रस्ता निर्मनुष्य व ओसाड पडला होता. कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नगर, सोलापूर, पुणे, बीड, नाशिक, धुळे या जिल्हयातील पंधरा सुशिक्षित तरूण आले आणि वाडीमधील एका व्यक्तीचे घर कोठे आहे अशी विचारणा केली.

ज्या व्यक्तीच्या घराचा पत्ता हे विचारतात तो त्यांचा अठरा वर्षांपूर्वीचा मित्र होता. त्याचे नाव कै.बळीराम पेटकर होय. मागील महिन्यामध्ये पुणे जिल्हयातील भिगवण येथे या बळीराम पेटकर या तरूण शिक्षकाचे अपघाती निधन झाले होते. आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले हे सर्व जण सन २००० मध्ये  पुणे येथील महात्मा गांधी अध्यापक विद्यालय, अरण्येश्वर येथे एकत्र शिकत होते. या नंतर या सर्वाचा एकमेकांशी फोन वरून होता तेवढाच काय तो संपर्क . बळीराम हा आतिशय गरीब होता. त्याचे घर छपराचे होते. त्याची पत्नी, दोन मुले, आई वडील तेथे राहतात मित्राच्या अपघाती निधनाची माहिती या सर्वाना समजली.

घरचा कर्ता मुलगा गेल्याने सर्व कूटूबांवर मोठे संकट कोसळले होते. यामुळे या मित्राच्या कूटूबांला आधार देण्याचा या सर्व मित्रानी निर्धार केला त्यांनी मयत शिक्षक मित्राच्या मुलाच्या नावावर बॅकेमध्ये एक लाखाची ठेव ठेवल्याची पावती आणि आईस 25 हजार रूपये रोख दिले, आमचा मित्र आम्ही गमावला आहे हे नुकसान भरून येणारे नाही आम्ही करीत आहोत ते आमर्च कर्तव्य आहे असे सांगताना मित्रांचे डोळे पाणावले. गावचे सरंपच विजय तोरडमल, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक खेडकर हे दोघे व उपस्थित ग्रामस्थ भावनिक झाले होते.