जिल्ह्यत पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून सुमारे पावणे चार लाख लोकसंख्येला आपली तहान भागविण्यासाठी टॅंकरच्या पाण्याची वाट पाहावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ १८८ टँकरद्वारे १८१ गावातील १ हजार १३६ वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले,की  जिल्ह्यत सध्या १८२ खाजगी  व ६ शासकीय अशा एकूण १८८  टँकरद्वारे १८१ गावातील १ हजार १३६ वाडय़ांमधील ३ लाख ७६ हजार ९६५ बाधित लोकसंख्येला व ५१ हजार १३५ पशुधन संख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यत एकूण ९६ खाजगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

जत तालुक्यात १२३ गावांपकी ९२ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील ६७१ वाडय़ांमधील २ लाख २३ हजार १३१ बाधित लोकसंख्येला सर्वाधिक १०९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जत तालुक्यात २४ खाजगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

तर ३ डिझेल इंजिन भाडय़ाने घेण्यात आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात ६० गावांपकी २० गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील ९८ वाडय़ांमधील २९ हजार ५५० बाधित लोकसंख्येला १४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात १३ खाजगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

तासगाव तालुक्यात ६९ गावांपकी २२ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील १२७ वाडय़ांमधील ३३ हजार १९८ बाधित लोकसंख्येला १३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तासगाव तालुक्यात १४ खाजगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत. मिरज तालुक्यात ७२ गावांपकी ८ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील २ ४ वाडय़ांमधील १८ हजार ४६५ बाधित लोकसंख्येला ४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. मिरज तालुक्यात ३ खाजगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

खानापूर तालुक्यात ६६ गावांपकी १५ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील २ वाडय़ांमधील २३ हजार ३९७ बाधित लोकसंख्येला १३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. खानापूर तालुक्यात २४ खाजगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत. आटपाडी तालुक्यात ६० गावांपकी २४ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील २१४ वाडय़ांमधील ४९ हजार २२४ बाधित लोकसंख्येला ३५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. आटपाडी तालुक्यात १८ खाजगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.