27 November 2020

News Flash

राज्यातील १९ शहरे पाणंदमुक्त

सातारा, वाई, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वरचा समावेश

‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत राज्यातील १९ शहरे पाणंदमुक्त झाल्याचे नगरविकास मंत्रालयाने जाहीर केले आहे. यामध्ये जिल्हय़ातील सातारा, वाई, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वर या पाच शहरांचा समावेश आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सातारा, वाई, पाचगणी, महाबळेवर आणि मलकापूर या जिल्हय़ातील पाच पालिका मागील दीड वर्षांपासून ही मोहीम राबवित होत्या. यासाठी वेळोवेळी बठका, जनजागृतीद्वारे नागरिकांना वैयक्तिक व लगतच्या दोनचार शेजाऱ्यात मिळून गटशौचालयाची योजना राबविण्यात येत होती. जनजागृतीद्वारे नागरिकांना उघडयावर शौचास जाण्यापासून परावृत्त करण्यात आले.गुडमॉíनग पथकाद्वारे नदी काठावर ओढयालगत मोकळया मदानात शौचास जाणाऱ्यांकडून दंड वसुलीची मोहीम राबविण्यात आली. पालिकेने नागरिकांसाठी सुलभ शौचालयासह शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. वाईला 135 व्यिक्तकडे शौचालय नसल्याची आकडेवारी समोर आल्यावर याच नागरिकांवर लक्ष केंद्रित करुन यातील ७५ नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी पालिकेने दहा हजार, तर केंद्र व राज्य शासनाचे बारा हजार असे अनुदान देण्यात येत आहे.अहमदाबाद येथील सेष्ट युनिव्हर्सिटीने वाई पालिकेला मदत केली.
पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटनस्थळावर ही मोहीम पहिल्यापासून राबविण्यात येते आहे. तर सातारा, मलकापूरलाही यासाठी मोठया प्रमाणत जागृती करुन नागरिकांना यात समाविष्ट करण्यात आली.
आज मुंबई येथे गांधी जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या १९ नगरपालिकांच्या अध्यक्षांचा मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सातारा जिल्हयातील सर्वाधिक पाच पालिकांची निवड या अभियानात झाल्याने साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्रल, सातारचे सचिन सरस, मुख्याधिकारी अभिजित बापट, वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड, मुख्याधिकारी आशा राऊत, पाचगणीचे नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, मुख्याधिकारी विद्या राऊत, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, मुख्याधिकारी सचिन पवार आदींचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी मुंबईत केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2015 3:10 am

Web Title: 19 cities toilet free in the state
टॅग Wai
Next Stories
1 उजनी पाण्याचा गैरवापर खेदजनक – यादव
2 खेडय़ातील पर्यावरणही ऐरणीवर
3 विखे यांची राज्य सरकारवर टीका
Just Now!
X